गोवा स्वयंपूर्ण बनविण्यात महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2024 10:06 AM2024-12-11T10:06:57+5:302024-12-11T10:07:44+5:30

मडगाव येथे सरस प्रदर्शनाचे उद्घाटन

important contribution of women in making goa self sufficient said cm pramod sawant | गोवा स्वयंपूर्ण बनविण्यात महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा स्वयंपूर्ण बनविण्यात महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : गोवा स्वयंपूर्ण करण्यास महिलांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. रवींद्र भवन मडगाव येथे ग्रामीण कारागिरांसाठी पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित असलेल्या सरस प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, दक्षिण गोवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक दीपाली नाईक, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा संजना वेळीप, रवींद्र भवन मडगावचे अध्यक्ष राजेंद्र तालक, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले, की नारी शक्तीला सलाम करण्यासाठी उत्तर व दक्षिण गोव्यातील महिलांसाठी सरस प्रदर्शन आयोजित करण्यात येते. गोव्यात सुमारे ४२०० स्वयंसेवी गट असून, सुमारे ४ लाख महिला स्वयंसेवी गटाच्या सदस्य आहेत. या महिला आपल्या कुशलतेच्या बळावर कला शिकून घेऊन गोव्याची संस्कृती टिकवून ठेवण्याबरोबरच आपला स्वतःचा व्यवसाय करतात. स्वयंसेवी महिला गटाच्या महिला सुमारे १ लाख रुपयांपर्यंत विना हमीदार कर्ज बँकेमधून दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन अनेक महिला लखपती झाल्या आहेत. आपण स्वतः अशा लखपती दीदींना भेटून त्यांच्या व्यवसायाबद्दल माहिती जाणून घेतली आहे. त्यांनीही आपल्याला अभिमानाने लखपती दीदी बनल्याचे सांगितले. काही जणांनी मलेशिया, सिंगापूर विदेश दौरे केल्याचा अनुभव आपल्याला सांगितला. हे सर्व भाजपच्या सरकारमुळे शक्य झाल्याचे त्या महिला सांगतात, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मंत्री फळदेसाई, आमदार तुयेकर यांनीही आपले विचार मांडले.

राज्यात आहेत ११ हजार 'लखपती दीदी' 

स्वयंसेवी महिला गटाच्या महिला सुमारे १ लाख रुपयांपर्यंत विना हमीदार कर्ज बँकेमधून दिले जाते. आज अनेक महिलांनी बँकेमधून मिळणारे विना हमीदार कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. त्यातून लखपती दीदी बनल्याची कित्येक उदाहरणे गोव्यात असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. गोव्यात सुमारे ११ हजार महिला लखपती दीदी बनल्याचे सरकारजवळ नोंद असल्याचे माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

 

 

Web Title: important contribution of women in making goa self sufficient said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.