२०२७ मध्ये गोव्यात येईल 'आप'चे स्वबळावर सरकार; राष्ट्रीय नेत्यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 10:50 AM2023-11-27T10:50:12+5:302023-11-27T10:54:37+5:30

पणजी येथे आपच्या ११ व्या स्थापना दिनानिमित आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

in 2027 aap will come to goa on its own national leaders expressed confidence | २०२७ मध्ये गोव्यात येईल 'आप'चे स्वबळावर सरकार; राष्ट्रीय नेत्यांनी व्यक्त केला विश्वास

२०२७ मध्ये गोव्यात येईल 'आप'चे स्वबळावर सरकार; राष्ट्रीय नेत्यांनी व्यक्त केला विश्वास

पणजी : २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष (आप) गोव्यात आपले सरकार स्थापन करणार. ते सुद्धा कुणाच्या मदतीने नव्हे, तर स्वबळावर स्थापन करू, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी पणजी येथे आपच्या ११ व्या स्थापना दिनानिमित आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

आप आपला स्थापना दिवस पणजीतील सभागृहात साजरा करीत आहे. मात्र, २०२७ मध्ये जेव्हा आम्ही स्थापना दिन साजरा करू, तेव्हा आम्ही सरकारमध्ये असणार. पक्षाच्या आमदारांची संख्या २०२७ मध्ये दोन वरून नक्कीच वाढेल. पक्षाचे काम गोव्यात वाढत असल्याचा विश्वासही नेत्यांनी व्यक्त केला.

यावेळी पंजाब सरकारमधील आपचे महसूल, पुनर्वसन मंत्री ब्रह्म शंकर जिम्पा, गोवा आपचे नेता अॅड. अमित पालेकर, बाणावलीचे आमदार कॅप्टन वेन्झी व्हिएगस व अन्य मान्यवर उपस्थित होते. केंद्र सरकारच्या डोळ्यांत आपची प्रगती खुपत आहे. म्हणूनच विविध आरोप करून पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात पाठवले जात आहे. ईडी, सीबीआयला केंद्र सरकार आपल्याला हवे ते निर्देश देत आहेत. मात्र, काहीही झाले तरी आपचे कार्यकर्ते या सर्वांला घाबरणार नाही. ते आपले काम सुरूच ठेवणार आहेत. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला एक नव्हे, तर दिल्ली व पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये आपचे सरकार स्थापन करून दाखवले. गोव्यातही आप सरकार स्थापन करेल, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.

पंजाब सरकारमधील मंत्री ब्रह्म शंकर जिम्पा म्हणाले, की पंजाबमध्ये आपचे सरकार उत्कृष्ट काम करीत आहे. शिक्षण, वीज, पाणी, रोजगार क्षेत्रात काम करीत आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे सर्व आमदार, मंत्र्यांची समान करीत आहेत. ते पक्षपातीपणे निर्णय घेत नाही. आप सरकारवर पंजाबच्या लोकांचा विश्वास बसला असून ते नेहमीच लोकांच्या विकासाठी काम करत असून यापुढेही करीत राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी ५० टक्के सवलत

आपकडून बाणावली येथे सुरू केलेल्या व्हिजन क्लिनिकमध्ये आता केवळ बाणावली येथील लोकांचेच नव्हे, तर राज्यभरातील लोकांवर उपचार केले जातील. मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेवर या क्लिनिकमध्ये ५० टक्के सवलत दिली जाईल. बाणावली येथे पक्षाच्यावतीने मोहल्ला क्लिनिक सुरू केले असून ते गोव्याच्या आरोग्य क्षेत्रातील एक मॉडेल म्हणून लवकरच गणले जाईल, असे आमदार कॅप्टन वेन्झी व्हिएगस यांनी सांगितले.

 

Web Title: in 2027 aap will come to goa on its own national leaders expressed confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.