मेडिक्लेम योजनेचा लाभ आता ५ लाखांपर्यंत; राज्य सरकारचा निर्णय
By पूजा प्रभूगावकर | Published: July 13, 2024 05:12 PM2024-07-13T17:12:01+5:302024-07-13T17:14:10+5:30
गोवा मेडिक्लेम योजनेचा लाभ वाढवून तो ५ लाख रुपये करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी:गोवा मेडिक्लेम योजनेचा लाभ वाढवून तो ५ लाख रुपये करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याशिवाय या योजनेसाठी उत्पन्नाची मर्यादाही ८ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे.
गोवा सरकारने मेडिक्लेम योजने अंतर्गत दिला जाणारा आर्थिक आरोग्य विम्याच्या रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी नागरिकांना १.५० लाखांपर्यंत लाभ मिळायचा. मात्र आता त्यात वाढ करुन ही रक्कम ५ लाख रुपये केली आहे. गोव्यात १५ वर्ष वास्तव्य असलेल्या सर्व नागरिकांना तसेच मतदार यादीत नाव असलेल्यांना या मेडिक्लेम योजनेचा फायदा मिळेल. यात कुटुंबातील लहान मुलांचाही समावेश असेल.
याशिवाय या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्यांच्या उत्पन्नाच्या मर्यादेतही वाढ करुन ती ८ लाख रुपये केली आहे. त्यामुळे ८ लाखांपर्यंत ज्यांचे वार्षिक उत्पन्न असेल ते मेडिक्लेम योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील, असे गोवा सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद केले आहे.