गोव्यात वन क्षेत्रात आता ‘ड्रोन’ची करडी नजर; आग दुर्घटना रोखण्यासाठी उपाय 

By किशोर कुबल | Published: December 11, 2023 07:31 PM2023-12-11T19:31:08+5:302023-12-11T19:31:28+5:30

वन क्षेत्रात आग लागण्याच्या घटना रोखण्यासाठी खात्याने आतापासूनच नियोजन केले आहे.

In Goa forest area, drones now have a dark eye Measures to prevent fire accidents | गोव्यात वन क्षेत्रात आता ‘ड्रोन’ची करडी नजर; आग दुर्घटना रोखण्यासाठी उपाय 

गोव्यात वन क्षेत्रात आता ‘ड्रोन’ची करडी नजर; आग दुर्घटना रोखण्यासाठी उपाय 

पणजी : वन क्षेत्रात आग लागण्याच्या घटना रोखण्यासाठी खात्याने आतापासूनच नियोजन केले आहे. ८ ते १० ड्रोन करडी नजर ठेवणार असून येत्या ३१ पर्यंत ६०० ट्रकर्सना प्रशिक्षण दिले जाईल. लोकसहभाग घेताना आणखी ‘आपदा मित्र’ व ‘आपदा सखीं’ना आग दुर्घटनेवळी मदतकार्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वनमंत्री विश्वजित राणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. काजु बागायतींमध्ये आगी लावण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. अभयारण्यांमध्ये तसेच वन क्षेत्रात गेल्या वर्षी आग दुर्घटनांनंतर लागू केलेली मार्गदर्शक तत्त्वें पुन्हा जारी केली आहेत. जिल्हाधिकाय्रांना निर्देश देण्यात आलेले असून ते यासंबंधी आवश्यक त्या नोटिसा बजावतील, असे विश्वजित यांनी सांगितले. गेल्या वर्षी गोव्यातील जंगलामध्ये वणवे पेटण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या होत्या. त्यामुळे या उपाययोजना केल्या आहेत. विश्वजित म्हणाले कि,‘ड्रोनच्या माध्यमातून वन क्षेत्र तसेच अभयारण्यांमधील प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल.  

३६५ हेक्टर क्षेत्रात वृक्षारोपण
विश्वजित पुढे म्हणाले कि, गेल्या वर्षी सत्तरी, सांगे, केपें, काणकोण भागात वन क्षेत्रांमध्ये आगीच्या दुर्घटना घडल्यानंतर वन खात्यावर दोषारोप होऊ लागले. अशा दुर्घटना घडल्यानंतर त्यावर मात करण्याची जबाबदारी वन खात्याबरोबरच आपत्ती व्यवस्थापनाचीही असते. गेल्या वर्षी आगित झाडे नष्ट झाली त्याची भरपाई करण्यासाठी ३६५ हेक्टर क्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले.

Web Title: In Goa forest area, drones now have a dark eye Measures to prevent fire accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goafireगोवाआग