भाजप कार्यकर्त्यांचा अपमान करणाऱ्या सुदिन ढवळीकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; मडकई भाजपची मागणी
By आप्पा बुवा | Published: June 14, 2024 05:23 PM2024-06-14T17:23:00+5:302024-06-14T17:24:38+5:30
मडकई येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी निष्ठापूर्वक काम केलेले असताना वीज मंत्री सुदिन ढवळीकर मात्र मडकईतील कार्यकर्त्यांनी काहीच काम केले नाही, असे म्हटलेले आहे.
अप्पा बुवा,गोवा : मडकई येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी निष्ठापूर्वक काम केलेले असताना वीज मंत्री सुदिन ढवळीकर मात्र मडकईतील कार्यकर्त्यांनी काहीच काम केले नाही, असे म्हटलेले आहे. या त्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करत असून, मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी. अशी मागणी मडकई येथील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी व मंडळ पदाधिकाऱ्याननी केली आहे. फोंडा येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी सुदेश भिंगि ,संतोष रामनाथकर, जयराम नाईक, प्रशांत नाईक आदी भाजप मंडळाचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
या संदर्भात बोलताना सुदेश भिंगी पुढे म्हणाले की, मागच्या लोकसभा निवडणुकीत सुदिन ढवळीकर यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. असे असतानाही आम्ही आमच्या स्वबळावर १२ हजार मते भाजपला दिली होती .यावेळी मगो पक्ष भाजप बरोबर असल्याने हा आकडा वाढायला हवा होता. परंतु तसे झालेले नाही. आम्हाला येथे किरकोळ आघाडी मिळालेली आहे. ज्या शहापूर प्रभागात ढवळीकर यांचे पंच सदस्य आहेत तेथे काँग्रेसला साडेचारशे अधिक मते मिळालेली आहेत. भाजपला मात्र येथे नाममात्र मते पडली आहेत हे नमूद करण्यासारखे आहे.
मडकई येथील भाजप कार्यकर्त्यांचा ढवळीकर यांनी नेहमी अपमान केला आहे. संपूर्ण प्रचारादरम्यान त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना कुठेच बोलावले नाही.