पूजा शर्माला अटक होण्याची भीती; एसआयटीपुढे न जाता अटकपूर्व जामीनसाठी धाव
By वासुदेव.पागी | Published: July 1, 2024 05:09 PM2024-07-01T17:09:02+5:302024-07-01T17:10:24+5:30
आसगाव गुंडगिरी प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्मा हिने क्राईम ब्रँचचे समन्स जुमानले नाहीत.
वासुदेव पागी, पणजी: आसगाव गुंडगिरी प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्मा हिने क्राईम ब्रँचचे समन्स जुमानले नाहीत. आपल्याला एसआयटीकडून अटक होण्याची शक्यता आहे या भितीने तिने अटकपूर्व जामीनसाठी न्यायालयात धाव घेतली आहे.
पूजा शर्माला एसआयटीकडून सोमवार दि. १ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. हे समन्स आपल्याला उशिरा मिळाल्याचे तिने एसआयटीला कळविले आहे. तसेच एसआयटीपुढे चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी मूदत मागितली. आपल्या दुसरी तारीख द्यावी अशी मागणी तिने केली होती. परंतु 'एसआयटी'कडून या बाबतीत तिला प्रतिसाद मिळाला नव्हता.
अपेक्षेप्रमाणे पूजा शर्मा ही एसआयटीपुढे उपस्थित राहिली नाही. त्या ऐवजी तिने पणजी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला. एसआयटीपुढे चौकशीसाठी हजर राहिल्यास तिथे आपल्याला अटक होण्याची भिती तिला वाटत होती. कारण तिच्यासाठी काम करणाऱ्या तिच्या सहकाऱ्यांना एसआयटीकडून यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्यामुळेच तिने न्यायालयात धाव घेतली.