आसगाव प्रकरणात तीन महिला बाऊंसरांसह सहा जण अटकेत; पोलीस अधीक्षकांची माहिती
By पूजा प्रभूगावकर | Updated: June 28, 2024 16:59 IST2024-06-28T16:58:48+5:302024-06-28T16:59:49+5:30
आसगाव प्रकरणी एका पोलीस निरीक्षकाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर आरोप केले आहेत.

आसगाव प्रकरणात तीन महिला बाऊंसरांसह सहा जण अटकेत; पोलीस अधीक्षकांची माहिती
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: आसगाव येथील घर पाडल्याप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने सहा जणांना अटक केली असून यात तीन महिला बाऊंसरचा समावेश असल्याची माहिती विभागाचे पोलीस अधीक्षक राहूल गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आसगाव प्रकरणी एका पोलीस निरीक्षकाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर आरोप केले आहेत. त्या निरीक्षकाचे जबानी पत्राची प्रत आपल्याकडेही आहे. मात्र, त्यावर त्याची सही नाही तसेच त्याचे नावही नाही. त्यामुळे या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. या प्रकरणी तपास सुरु आहे. त्यामुळे सदर कागदपत्रे खोटे आहेत का नाही हे सांगणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या एसआयटी पथकाने सहा जणांना अटक केली आहे. एसआयटीने अटक केलेल्यां सहा जणांमध्ये अश्पाक शेख, महम्मद इम्रान सलिम, अझिम कादर शेख तसेच शहीन सौदागर (३८, कांदोळी) , बिसमिल्ला गोगुंडागी (४४, नेरुल) व शालन कल्लपा मोरेकर (४२, कांदोळी) या तीन महिला बाऊंसरांचा समावेश आहे.