राज्यात ८८ इंच पावसाची नोंद : सरासरीपेक्षा ४८.६ टक्के अधिक पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 04:24 PM2024-07-17T16:24:47+5:302024-07-17T16:35:21+5:30
राज्यात १ जून ते आतापर्यंत सरासरी ८८ इंच पावसाची नोंद झाली आहे.
नारायण गावस, पणजी: राज्यात १ जून ते आतापर्यंत सरासरी ८८ इंच पावसाची नोंद झाली आहे. यंदा सरासरीच्या तुलनेत ४८.६ टक्के अधिक पाऊस झाला आहे. सांगे, वाळपई, फोंडा या केंद्रात सर्वाधिक पाऊस झाला आहे. राज्यात अजूनही पावसाचा जोर कायम असून सर्वत्र पडझड तसेच दरडी काेसळण्याच्या घटना घडत आहेत.
राज्यात यावर्षी जून ३ पासून पावसाला सुरुवात झाली होती. या नंतर पाऊस सुरुचा आहे. पण जुलै महिन्यापासून पावसाचा जोर जास्त वाढला त्यामुळे सरासरीपेक्षा जास्त पाऊस यंदा झाला आहे. पुढील दाेन दिवस राज्य हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहेत.
पडझडीच्या घटना सुरुच-
फोतार्डा तळसण झर येथे घर पडून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. डिचाेली बायपास रस्त्यावर झाड कोसळले, चोर्ला घाटात रस्ता खचला इतर काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. मळा पणजी नेवगीनगर येथे समुद्राचे पाणी दुकानात शिरल्याने दुकानांचे नुकसान झाले. तसेच अन्य विविध लोकांच्या घरात पाणी शिरले आहे.
धरणे भरली नद्यांची पातळी वाढली-
राज्यातील सर्व धरणे भरली असल्याने पाण्याचा विसर्ग केला आहे. अंजूणे धरणातून पाण्याचा विसर्ग केला. तसेच तिळारीतून पाणी सोडण्यात आले. तसेच आमठाणे व इतर धरणही १०० टक्के भरली आहे. यंदा प्रथमच जुलै महिन्याचा १५ दिवसात सर्व धरणे भरली आहेत. तसेच राज्यातील सर्व नद्यांची पाण्याची पातळीही वाढली आहे.