म्हापसा, पेडणे व पणजी विधानसभा मतदारसंघांमध्ये तुलनेत कमी मतदान
By किशोर कुबल | Published: May 7, 2024 02:16 PM2024-05-07T14:16:37+5:302024-05-07T14:17:30+5:30
म्हापसा येथील प्रमुख मतदान केंद्रावर दुपारी शुकशुकाट होता.
किशोर कुबल, पणजी : उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात तुलनेत म्हापसा, पेडणे व पणजी या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये कमी मतदान झालेले आहे. म्हापसा येथील प्रमुख मतदान केंद्रावर दुपारी शुकशुकाट होता.
दुपारी १२ वाजेपर्यंत म्हापसा व पेडणेत प्रत्येकी २८ टक्के तर पणजीत केवळ २५ टक्के मतदान झाले. दुपारी म्हापसा मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवर अगदीच नगण्य उपस्थिती होती.
१२ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी-
उत्तर गोवा मतदारसंघ
मांद्रे ३८
पेडणे २८
डिचोली. ३१.२२
थिवी ३०
म्हापसा. २८
शिवोली. २८.७२
साळगाव. २९.७२
कळंगुट. ३२
पर्वरी. ३१.७४
हळदोणे. २८.०५
पणजी. २५
ताळगांव २८.६६
सांताक्रुज २८.३३
सांत आंद्रे २८.६६
कुंभारजुवे २९
मयें. २९
साखळी. ३९
पर्यें ३३.१३
वाळपई ३१.६३
प्रियोळ ३१