गोव्यात टोमॅटो ८० रुपये तर कांदा ५० रुपये किलो

By पूजा प्रभूगावकर | Published: June 23, 2024 05:12 PM2024-06-23T17:12:33+5:302024-06-23T17:13:11+5:30

कांद्याच्या दरात १० रुपयांनी वाढ होत तो ५० रुपये किलो झाला आहे.

In Goa tomato is Rs 80 and onion is Rs 50 per kg | गोव्यात टोमॅटो ८० रुपये तर कांदा ५० रुपये किलो

गोव्यात टोमॅटो ८० रुपये तर कांदा ५० रुपये किलो

पणजी: भाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. टाेमॅटो चक्क ८० रुपये किलो तर कांदा पुन्हा एकदा रडवू लागला आहे. कांद्याच्या दरात १० रुपयांनी वाढ होत तो ५० रुपये किलो झाला आहे.

पावसामुळे भाजी पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे भाज्यांची आवाक सरासरीपेक्षा कमी झाल्याने भाज्या महागल्या आहेत. कांदा ४० रुपये किलो या दराने मिळत होता. मात्र आता त्याच्या दरात १० रुपयांनी वाढ झाली आहे. तर टोमॅटोही महागला आहे. टोमॅटो ३० रुपयांवरुन ६० रुपये व आता ८० रुपये किलो या दराने मिळत आहे. तर बटाटा सध्या तरी ४० रुपये किलो इतका आहे. मात्र स्थिती कायम राहिल्यास टोमॅटो व कांदा शंभरीपार होऊ शकतो असे विक्रेते सांगत आहे.

याशिवाय वालपापडी अजूनही २०० पार आहे. पणजी बाजारात वालपापडी २२० ते २४० रुपये किलो आहे. तर कोथिंबीरची जुडी ५० रुपये झाली आहे.

Web Title: In Goa tomato is Rs 80 and onion is Rs 50 per kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.