भटक्या कुत्र्यांचे १०० टक्के लसीकरण करा; पशुसंर्वधन मंत्र्यांचे मिशन रेबीजच्या अधिकाऱ्यांना सुचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2024 04:04 PM2024-07-04T16:04:56+5:302024-07-04T16:08:29+5:30
मिशन रेबीज तर्फे बुधवारपासून दिवार बेटावर दुसरी विशेष मोहीम सुरू केली आहे.
नारायण गावस,पणजी: राज्यात वाढत्या भटक्या कुत्र्यांचा पशुसंवर्धन मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी आढावा घेतला आणि रेबीज विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी १०० टक्के कुत्र्यांना लसीकरण करण्याच्या सुचना मिशन रेबीज अधिकाऱ्यांना दिल्या आहे. मिशन रेबीज तर्फे बुधवारपासून दिवार बेटावर दुसरी विशेष मोहीम सुरू केली आहे.आतापर्यंत त्यांनी ८७८ कुत्र्यांचे लसीकरण केले असून ते शुक्रवार संध्याकाळपर्यंत सुरू राहणार आहे.
राज्यात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे मिशन रेबीजतर्फे त्यांना लसीकरण सुरु आहे. सर्व भटक्या कुत्र्यांना लसीकरण दिले जाते. त्यामुळे राज्यात रेबीज संख्या कमी झाली आहे. गेली अनेक वर्ष मिशन रेबजीकडून ही माेहिम राज्यभर राबविली जात आहे. त्यामुळे राज्यात भटक्या कुत्र्यांचे लसीकरण केले आहे.
मिशन रेबीजचे संचालक डॉ. मुरुगन पिल्लई म्हणाले, सर्व लसीकरण, शिक्षण आणि पाळत ठेवणे पथके कार्यरत आहेत. दिवार बेटावर कुत्र्यांची संख्या खूपच जास्त अंदाजे १५०० आहे जी त्या बेटावरील मानवी लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत विषम आहे. या बेटावर २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे ५ हजार आहे आणि आता ६ हजार असू शकते. पण कुत्र्यांची संख्या वाढत आहे. काही लाेकांनी बाहेरुन आणून या बेटावर कुत्र्यांच्या पिलांना बेटावर टाकले असावे किंवा सोडून दिले असावे किंवा कुत्र्यांना येथे अधिक खाद्य मिळते म्हणून त्यांचे मृत्यूचे प्रमाण कमी होते.