शाळेत जाणाऱ्या मुलाला महिलेने ठोकरले; जखमी विद्यार्थी रुग्णालयात दाखल
By आप्पा बुवा | Published: June 25, 2024 05:01 PM2024-06-25T17:01:59+5:302024-06-25T17:04:08+5:30
शाळेत जात असलेल्या एका विद्यार्थ्याला कारची धडक बसल्याने तो जखमी झाला असून त्याला उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले.
अप्पा बुवा, फोंडा: शाळेत जात असलेल्या एका विद्यार्थ्याला कारची धडक बसल्याने तो जखमी झाला असून त्याला उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. दाबाळ येथे सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या तिसरीच्या वर्गात शिक्षण घेणारा मयंक दुर्गेश गावकर या विद्यार्थ्याला कारची धडक बसल्याने तो जखमी झाला. सदर अपघात मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडला.
प्राप्त माहितीनुसार मंगळवारी सकाळी दाबाळ येथून कोडलीच्या दिशेने कार घेऊन एक महिला जात होती. त्यावेळी विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्याला तिच्या कारची धडक बसली. जखमी विद्यार्थ्याला खासगी वाहनातून पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी गोमेकोत दाखल करण्यात आले. कुडचडे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.