दीडशे प्रकरणात २४,७,५२५ चौ. मी जमीन केली हडप,‘एसआयटीकडे ३०० हून अधिक प्रकरणे

By वासुदेव.पागी | Published: April 26, 2023 05:09 PM2023-04-26T17:09:33+5:302023-04-26T17:09:48+5:30

भू-बळकाव प्रकरणांचा तपास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी)  ३०० हून अधिक तक्रारी आल्या आहेत.

In one and a half hundred cases, 24,7,525 sq. I grabbed the land, | दीडशे प्रकरणात २४,७,५२५ चौ. मी जमीन केली हडप,‘एसआयटीकडे ३०० हून अधिक प्रकरणे

दीडशे प्रकरणात २४,७,५२५ चौ. मी जमीन केली हडप,‘एसआयटीकडे ३०० हून अधिक प्रकरणे

googlenewsNext

पणजी : भू-बळकाव प्रकरणांचा तपास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी)  ३०० हून अधिक तक्रारी आल्या आहेत. आतापर्यंतच्या दीडशे प्रकरणात एकूण २४,७,५२५ चौरस मीटर जमीन बळकावल्याचे आढळून आले आहे. 

आतापर्यंत ३००हून अधिक तक्रारी एसआयटीकडे आल्या आहेत. एसआयटीचे अधीक्षक निधीन वालसान यांच्या नेतृत्त्वाखाली हा तपास सुरू असून, आतापर्यंत ५०हून अधिक गुन्हे नोंदविले आहेत. या प्रकरणात दीडशेहून अधिक बोगस विक्रीखते बनविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या संशयितांची संख्याही कमी नाही. परंतु त्याच त्याच लोकांना अटक होण्याचे प्रकार मात्र खूप घडले आहेत. कारण, जमिनी हडप करण्याच्या प्रकरणात गुंतलेली मंडळी ही एक भानगड पचनी पडले, असे आढळून आल्यानंतर अशा एकामागून एक भानगडी करण्याचा सपाटाच चालविला होता.

या प्रकरणात सर्वांत अगोदर अटक करण्यात आलेला विक्रांत शेट्टी याला नंतर अनेकवेळा वेगवेगळ्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तसेच सर्वाधिक प्रकरणात गुंतलेला मोहम्मद सोहेल याला ८ वेळा एसआयटीने ८ वेगळ्या भूखंड हडप प्रकरणात अटक केली आहे.

प्रकरणे वळविली पोलिस स्थानकात

एसआयटीकडे जमिनी हडप प्रकरणांचा ओघ सुरूच असल्यामुळे तपासकामाचा ताणही वाढत आहे. शिवाय मर्यादीत कर्मचारी, वाहने आणि इतर साधन सुविधांमुळे सर्व प्रकरणे हाताळणे एसआयटीला कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे तक्रारी तपासाशिवाय रखडत ठेवण्यापेक्षा त्या तक्रारी आता संबंधित क्षेत्रातील पोलिस स्थानकांना पाठविण्यात आल्याची माहिती एसआयटीकडून देण्यात आली. गरज पडेल तेव्हा आवश्यक ती प्रकरणे एसआयटी पुन्हा आपल्याकडे घेऊ शकते.

घोटाळ्याची व्यापकता
५० : गुन्हे
२० : जणांना अटक
१५० : बोगस विक्रीखते
९५ : बोगस दस्तऐवज
८० : हून अधिक भूखंड
२४,७,५२५ चौरस मीटर जमीन

Web Title: In one and a half hundred cases, 24,7,525 sq. I grabbed the land,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.