सापळा लावला ब्लॅक पॅंथरसाठी अडकला मात्र बिबट्या
By आप्पा बुवा | Published: November 19, 2023 04:05 PM2023-11-19T16:05:35+5:302023-11-19T16:07:16+5:30
वन खात्याने लावलेल्या सापळ्यात एक बिबट्या आढळून आल्याने सर्वत्र तो चर्चेचा विषय झाला आहे.
अप्पा बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: मागच्या काही दिवसात वंडाळा धारबांदोडा येथे ब्लॅक पॅंथरच आढळून आल्याने वन खात्याने त्याला पकडण्यासाठी लावलेल्या सापळ्यात एक बिबट्या आढळून आल्याने सर्वत्र तो चर्चेचा विषय झाला आहे.
सविस्तर वृत्तानुसार वांड्याळ धारबांदोडा येथील अतुल नाईक यांच्या घराच्या परिसरात एक ब्लॅक पॅंथर आढळून आला होता. परिसरातील कुत्री अचानक नाहीशी होत असल्याने, त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रात्रीच्या वेळेस तिथे ब्लॅक पॅंथरचा संचार असल्याचे आढळून आले होते. या संबंधी वन खात्याला माहिती देण्यात आल्यानंतर वन खात्याने ब्लॅक पॅंथरला पकडण्यासाठी सापळा लावला होता. त्याचबरोबर त्याचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले होते. त्या परिसरात ब्लॅक पॅंथर बरोबरच आणखीन एक बिबट्या असल्याचा सुद्धा संशय नागरिक व्यक्त करत होते. त्या दृष्टीने सुद्धा वनखात्याचे अधिकारी प्रयत्न करत होते.
रविवारी पहाटे तीन वाजता ब्लॅक पॅंथर साठी लावलेल्या सापळ्या मधून वाघाच्या डरकाळीचा आवाज ऐकू येतात स्थानिकांनी तिकडे जाऊन पाहणी केले असता तेथे बिबट्या अडकलेला आढळून आला. लगेचच सदरची माहिती वनखात्याला देण्यात आली. सदर बिबट्याला आरोग्य तपासणी करण्यासाठी बोंडला अभयारण्यात घेऊन गेले आलेत.
दरम्यान ब्लॅक पॅंथरणे वांड्याळ परिसर सोडून तळसाय परिसरात कुच केल्याचे पुरावे मिळत आहेत. वन खात्याने त्याला पकडण्यासाठी सुद्धा उपाययोजना सुरू ठेवल्या आहेत.