खोलीतच सुरू केला रूलेट कॅसिनो; २ छाप्यात दोघांना अटक

By वासुदेव.पागी | Published: October 12, 2023 04:08 PM2023-10-12T16:08:29+5:302023-10-12T16:08:39+5:30

कळंगुट येथील मार्केटमधील एका दुकानातही असाच प्रकारचा कॅसिनो सुरू होता

In-room roulette casino launched; Two arrested in 2 raids in goa | खोलीतच सुरू केला रूलेट कॅसिनो; २ छाप्यात दोघांना अटक

खोलीतच सुरू केला रूलेट कॅसिनो; २ छाप्यात दोघांना अटक

पणजी: आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारचे थक्क करणारे ‘जुगाड’ करणाऱ्या लोकांची कमतरताना ही. परंतु जुगारासाठी ‘जुगाड’ करताना चक्क घराच्या खोलीतच रूलेट कॅसिनो चालविण्याचा कारनामा साखळीतील  कारापूर - तिस्क येथे एकाने केला.  या कॅसिनोसह आणखी एका कॅसिनोवर कारवाई करून पोलिसांनी एकूण दोघांना अटक केली. 

तिस्क भागात एका खोलीतच बुलू ऋषिकेश परिदा नामक इसमाने  ‘रूलेट कॅसिनो’ थाटला होता. त्याठिकाणी ठराविक वेळेला लोकांची होणारी गर्दी पाहून अनेकांना संशय आला होता. पोलिसांपर्यत ही माहिती पोहोचली होती.   या माहितीच्या आधारे बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्या खोलीवर छापा टाकून जुगार खेळणाऱ्यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत बुलू ऋषिकेश परिदा याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १ पैसे आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.  रात्री उशिरा त्याला जामिनावर सोडण्यात आले.  
कळंगुट येथील मार्केटमधील एका दुकानातही असाच प्रकारचा कॅसिनो सुरू होता. याठिकाणीही  जुगार खेळणाऱ्यांची रेलचेल चालू होती. हा कॅसिनो अजय कुमार नामक  मूळ उत्तर प्रदश येथील इसमाने सुरू केला होता.  कळंगूट पोलिसांनी त्याला अटक केली. 

रुलेट कॅसिनो म्हणजे काय
एक प्रकारचा जुगाराचा खेळ टेबल दोन विभाग बनलेले आहे, चाक स्वतः आणि सट्टेबाजी लेआउट, अधिक चांगले रूले लेआउट म्हणून ओळखले जाते. रूलेट टेबलच्या दोन शैली आहेत. एका टोकाला रूलेट व्हीलसह एकच बेटिंग लेआउट आहे आणि दुसर्‍यामध्ये मध्यभागी चाकासह दोन लेआउट आहेत. चाक आडवे फिरते.

Web Title: In-room roulette casino launched; Two arrested in 2 raids in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.