दक्षिण गोव्यात चिंचणीत सराफी दुकान फोडले; सोने व चांदींचे दागिने मिळून दहा लाखांचा ऐवज लुटला
By सूरज.नाईकपवार | Published: January 24, 2024 04:55 PM2024-01-24T16:55:50+5:302024-01-24T16:57:27+5:30
अज्ञात चोरटयाने झरीर गोल्ड अँण्ड ज्युवेलर्स या सराफी दुकानात चोरी करुन सोन्याचे व चांदीचे दागिने मिळून दहा लाखांचा ऐवज लुटला.
सूरज नाईकपवार,मडगाव: चोरटयाने सदया कहर माजिवला असून, चिंचणी येथे मंगळवारी रात्री अज्ञात चोरटयाने झरीर गोल्ड अँण्ड ज्युवेलर्स या सराफी दुकानात चोरी करुन सोन्याचे व चांदीचे दागिने मिळून दहा लाखांचा ऐवज लुटला. या चाेरीमुळे या भागात भितीचे वातावरण पसरले आहे. दुकानाच्या खिडकीचे ग्रील्स तोडून आत शिरुन चोरटयाने आतील दागिने लंपास केले. सीसीटिव्हीकॅमेरात चोरटयांची छबी टिपली गेली आहे.
एकूण चारजणाने ही चोरी केली असून, त्यांनी आपला कपडयाने झाकला होता. क़ुंकळ्ळी पोलिसांनी भादंसंच्या ४५७ व ३८० कलमाखाली वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कविता रावत पुढील तपास करीत आहेत.
नावेली येथील मलिक झियाउद्दीन यांच्या मालकीचे हे सोन्याचे दुकान आहे. मंगळवारी रात्री दहा वाजता ते दुकान बंद करुन गेले होते. नतंर रात्री बाराच्या सुमारास त्यांना या चोरीबाबत माहिती मिळल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, चोरी झाल्याचे उघड झाले. या चाेरीत दहा किलो चांदीचे दागिने व १०० ग्राम सोने चोरीला गेले आहे.चोरटयांचा माग काढण्यासाठी श्वान पथक तसेच ठसेतंज्ञानाही बोलावून घेण्यात आले.