उन्हाळ्यात लाेकांचा कल हलक्या आहाराकडे; तेलकट मसालेदार आहाराकडे पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 04:09 PM2024-03-31T16:09:49+5:302024-03-31T16:09:49+5:30
उन्हाळ्यात बहुतांश लाेक गावठी भाजी भात तसेच सॅलेड यासारखे हलक्या पदार्ध जास्त खातात. मसालेदार तसेच इतर तेलकट पदार्थ खात नाहीत.
नारायण गावस
पणजी: उष्णतेत माेठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने लाेकांना याच त्रास सहन करावा लागत आहे. शरीराला गारवा मिळविण्यासाठी लोक आता मसालेदार तिकट तसेच चटपटीत आहार साेडून साधा शरीराला गारवा देणारा आहार घेत आहेत. बहुतांश लाेक सध्या दही, ताक, गावठी प्याज, ताकभात तसेच इतर मसाले नसलेल्या आहारचे सेवन करत आहेत.
पौष्टीक भाज्यांचे सेवन
उन्हाळ्यात बहुतांश लाेक गावठी भाजी भात तसेच सॅलेड यासारखे हलक्या पदार्ध जास्त खातात. मसालेदार तसेच इतर तेलकट पदार्थ खात नाहीत. उन्हाळ्यात तांबडी भाजी, मेथी, दुधी, पपयाची भाजी या सारख्या भाज्या या शरीराला गारवा देत असल्याने लाेक अशा भाज्या सेवत जास्त करत आहेत. तसेच पौष्टिक असे सॅलेड खात आहेत. फास्ट फुडचे पदार्थांची मागणीही घटली आहे. बहुतांश लाेक दहीभाताचा आहार घेत आहेत.
फळांचा आहार
फळे ही कुठल्याही ऋतूत चांगली असतात त्यात उष्णतेमध्ये तर फळे खूप फायदेशीर ठरत असतात. त्यामुळे कलिंगड, संत्री, द्राक्षे काेकम, लिंबू याचा रस तसेच इतर फळे मोठ्या प्रमाणात लोक खात आहे. त्यामुळे फळांची मागणी वाढली आहे तसेच त्यांच्या किमतीही वाढल्या आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कलिंगड, दुधी, द्राक्षे यांचा खूप लाभ होत आहे. यामुळे शरीराला गारवा मिळतो तसेच ताकदही मिळते. म्हणून बहुतांश लाक आता फळांचा आहार जास्त घेत आहे.