चालू वर्षात २७ जणांचा रेल्वेखाली सापडून मृत्यू; नऊ मृतदेहांची ओळख अजून नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 08:23 AM2023-10-23T08:23:34+5:302023-10-23T08:23:57+5:30

१८ मृतदेहांची ओळख पटली आहे.

in the current year 27 people died after being found under the train | चालू वर्षात २७ जणांचा रेल्वेखाली सापडून मृत्यू; नऊ मृतदेहांची ओळख अजून नाहीच

चालू वर्षात २७ जणांचा रेल्वेखाली सापडून मृत्यू; नऊ मृतदेहांची ओळख अजून नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव: रेल्वेखाली सापडून मृत्यू होण्याच्या घटना वाढत असून चालू वर्षात आतापर्यंत कोकण रेल्वे मार्गावर २७ जण रेल्वेखाली सापडून मरण पावले आहेत. यातील २३ जण प्रत्यक्षात रेल्वेखाली सापडले आहेत तर ४ जणांनी रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. नऊ मृतदेहांची ओळख पटू शकलेली नाही. तर - १८ मृतदेहांची ओळख पटली आहे.

कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांनी दिलेल्या माहितीनुसार मडगाव रेल्वेस्थानक महाविद्यालय ते दामोदर गेट या दरम्यान सर्वात जास्त प्रकरणे घडतात. येथे रेल्वेखाली सापडून मरण पावल्याची एकूण १२ प्रकरणे घडली आहेत. तर रेल्वेखाली येऊन आत्महत्या करण्याच्या घटना मडगाव ते माजोर्डा दरम्यान रेल्वे मार्गावर घडलेल्या आहेत.

लोकांनी रेल्वे रुळ ओलांडू नये, असे आवाहनही कोकण रेल्वे पोलिसांनी केले आहे. अनेकदा रेल्वे येत असताना गेट पडलेली असतानाही लोक रेल्वे रुळ ओलांडण्याचे प्रयत्न करतात, हे धाडस मृत्यूच्या दारात नेणारे ठरते, असेही सूत्रांनी सांगितले.

 

Web Title: in the current year 27 people died after being found under the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.