स्मार्ट फोनच्या काळात वाचनालये पडली बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 07:44 PM2023-08-23T19:44:57+5:302023-08-23T19:45:04+5:30

स्मार्ट फोनमुळे वाचनाकडे दुलर्क्ष

In the era of smart phones, libraries were closed | स्मार्ट फोनच्या काळात वाचनालये पडली बंद

स्मार्ट फोनच्या काळात वाचनालये पडली बंद

googlenewsNext

नारायण गावस 

पणजी: नवीन पिढी वाचनाकडे वळावी यासाठी सरकारकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. पण त्याला चांगला प्रतिसाद मिळत नाही. सध्या राज्यात ६० ग्रामपंचायतीत वाचनालये आहेत. यातील ४५ कशीबशी सुरु आहेत तर यातील १५ वाचनालये बंद पडली आहे. वाचकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने ही वाचनालये बंद पडल्याची माहिती समोर आली आहे.

स्मार्ट फोनमुळे वाचनाकडे दुलर्क्ष

मागील काही वर्षापासून स्मार्ट फाेनच्या वाढत्या प्रभावामुळे वाचनाकडे लाेकांनी पाठ फिरवीली आहे. काही वर्षापूर्वी विद्यर्थी संशोधन करण्यासाठी वाचनालयात जाऊन अनेक पुस्तकांचे वाचन करत होते. पण आता गुगल फेसबुक, युट्युब अशा साेशल मिडीयावरुन माहिती गाेळा करुन आपला अभ्यास करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून पुस्तकांचे वाचन होत नाही. तसेच ग्रामीण भागातील लोकही पंचायत पातळीवरील वाचनालयात कधी जात नाही अशा विविध कारणामुळे ही वाचनालये बंद पडली आहे,

शिक्षकांनी पुढाकर घेणे गरजेचे आहे
विद्यार्थाी वाचनाकडे वळावे यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा. प्रत्येक शिक्षकाने वर्षाला किमान १० पुस्तके वाचण्याचा निर्णय झाला होता. शिक्षकांनी या १० पुस्तकांची माहिती विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे. पण किती शिक्षक पुस्तके वाचतात हे शिक्षण खात्याला माहित असणार. जर शिक्षकच नवीन पुस्तके वाचत नसेल तर विद्यार्थीही वाचनाकडेे वळू शकणार नाही. आता नविन शिक्षण धोरणात संशोधन शिक्षणावर जास्त भर दिली आहे. यामुळे शिक्षकांना तसेच विद्यार्थंना वाचनावर जास्त भर द्यावी लागणार आहे.

वाचनाकडे गरज म्हणून पाहिले पाहीजे लहानपणापासून मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण केली पाहीजे. पालकांनी मुलांना हातात मोबाईल देण्यापेक्षा पुस्तक द्यावे जेणेकरुन मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण हाेईल.- अनिल सामंत - साहित्यिक - अध्यक्ष मराठी अकादमी मराठी

वाचनामुळे बौद्धीक वाढ होत असते पण माेबाईलच्या काळात सर्वजण वाचनाकडे दुर्लक्ष करत आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे. त्यामुळे पालकांनी तसेच आम्ही सर्वांनी वाचनाचे महत्व नव्या पिढीला सांगणे गरजेचे आहे.-सरिता कामत : शिक्षिका

तालुका -वाचनालये

  • तिसवाडी - ४
  • फोंडा -२
  • सांगे -२
  • धारबांदोडा -२
  • बार्देश- ९
  • सत्तरी -२
  • पडणे -१२
  • सासष्टी - ४
  • केपे -३
  • काणकोण -३
  • डिचाेली - २

Web Title: In the era of smart phones, libraries were closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा