उष्णतेत वीजेचा होतोय लपंडाव, सर्वसामान्य लोक हैराण 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 04:32 PM2024-05-03T16:32:08+5:302024-05-03T16:32:18+5:30

या आठवड्यात तापमान आणखी वाढणार असून ते ३६ अंशावर जाण्याची शक्यता हवामान वर्तविली आहे.

In the heat, electricity is hidden, common people are shocked | उष्णतेत वीजेचा होतोय लपंडाव, सर्वसामान्य लोक हैराण 

उष्णतेत वीजेचा होतोय लपंडाव, सर्वसामान्य लोक हैराण 

 - नारायण गावस

पणजी : राज्यात एकाबाजूने दिवसेंदिवस उष्णता वाढत आहे तर दुसऱ्या बाजूने लोकांना वीजेच्या लपंडावला सामोरे जावे लागत आहे. पावसाळी पूर्व कामे वीज खात्याने हाती घेतल्याने  अनेकवेळा वीज बंद ठेवली जात आहे. याचा फटका घरातील लोकांप्रमाणे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बसत आहे. वीज बंद असल्याने पंखे तसेच एसीचा वापर करायला मिळत नसल्याने लोक हैराण झाले आहे.

शहरापासून खेड्यागावांपर्यंत सर्वत्र सध्या लोक उष्णतेने हैराण आहेत. वीज खात्याचे कर्मचारी नवीन केबल घालण्यासाठी तसेच   वीज तारांना लागलेल्या  झाडांच्या फांद्या कापण्यासाठी तासनतास वीज बंद ठेऊन काम करत आहेत. त्यामुळे दिवसभर घरात राहणाऱ्या लोकांना पंखा तसेच एसीचा वापर करता येत नाही. त्यामुळे लोकांना मोठ्या  प्रमाणात उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. या उष्णतेमुळे  लहान मुलांना  तसेच ज्येष्ठ नागरिकांना खूपच त्रास होत आहे.

तापमानात आणखी वाढ
या आठवड्यात तापमान आणखी वाढणार असून ते ३६ अंशावर जाण्याची शक्यता हवामान वर्तविली आहे. पुढील आठ दिवस तापमान असेच चढेच राहणार आहे. हे तापमान सरासरी तापमानापेक्षा १ ते २ अंशाने वाढणार आहे. राज्यात सध्या सरासरी तापमान हे ३३.५ ते ३४.५ अंश असते ते आता वाढून ३५ ते ३६ पर्यंत जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना या तापमानाचा आणखी त्रास सहन करावा लागणार आहे. त्यातच वीजेचा लपंडाव असल्याने याचा नागरिकांना फटका  बसणार.  राज्यात मार्च महिना सुरु झाल्यापासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सियस पर्यंत गेले आहे. 

उष्णतेचा आरोग्यावर परिणाम
या वाढत्या उष्णतेमुळे लोकांच्या आरोग्यावर अनेक परिणाम दिसून येत आहे. लोकांना चक्कर येणे उलटी मळमळ या सरखे आजार जडले आहे. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे तसेच भर उन्हात बाहेर न जाण्याचे आवाहन आरोग्य खात्याने लोकांना केले आहे.

Web Title: In the heat, electricity is hidden, common people are shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.