गेल्या दोन वर्षात चार नवीन फेरीबोट लोकांच्या सेवेसाठी प्रदान

By समीर नाईक | Published: February 10, 2024 04:23 PM2024-02-10T16:23:10+5:302024-02-10T16:24:37+5:30

येणाऱ्या ६-७ महिन्यात रो-रो फेरीबोट देखील दिसणार. 

In the last two years four new boat have been provided for public service in goa | गेल्या दोन वर्षात चार नवीन फेरीबोट लोकांच्या सेवेसाठी प्रदान

गेल्या दोन वर्षात चार नवीन फेरीबोट लोकांच्या सेवेसाठी प्रदान

समीर नाईक, पणजी: नदी परिवहन खात्यातर्फे गेल्या दोन वर्षांत ४ नवीन फेरीबोट राज्यातील नद्यांमध्ये उतरविल्या आहेत. गेल्यावर्षी सह्याद्री आणि शिवनेरी या दोन फेरिबोट गेल्या वर्षी तर यंदा म्हादाई व दूधसागर या दोन फेरीबोट आम्ही नव्या आणल्या आहेत, अशी माहिती नदीपरिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

 पणजी येथील फेरीबोट धक्क्यावर म्हादाई व दूधसागर या दोन फेरीबोटीचे उद्घाटन शनिवारी मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याहस्ते झाले. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान. त्यांच्यासोबत साळगावचे आमदार केदार नाईक, कुंभारजूवेचे आमदार राजेश फळदेसाई, कॅप्टन ऑफ पोर्टचे कॅप्टन विकास गावणेकर, नदी परिवहन खात्याचे अधिकारी विक्रमसिंग भोंसले, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 येणाऱ्या ७-८ महिन्यांनंतर दोन रो-रो फेरीबोट देखील येणार आहेत. याची क्षमता १६ चारचाकी ची असणार आहे. जागा खूप असणार आहे. सगळ्याच जागेवर या फेरी असणार नाही, पण चाचणी करून पाहण्यात येईल. ज्या ठिकाणी ही चाचणी सफल होईल, त्या ठिकाणीच रो-रो ला सेवेसाठी सज्ज करण्यात येईल. या फेरीबोटला दोन्ही बाजूने रॅम्प असणार आहे. तसेच फेरीबोटींचा वेग जास्त असणार आहे. सुमारे १० नॉट (१८ ते १९ वेग) वेग असणार आहे, सध्या ज्या आहेत त्या ७ नॉट च्या आहेत. असे फळदेसाई यांनी यावेळी सांगितले. 

रो-रो फेरी बाबत निविदा काढण्यात आली आहे, पण फेरीबोट तयार करण्याची सूचना करण्यात आलेली नाही. येत्या १५ दिवसात हेही होणार आहे. दर घ्यावे की नाही, किती घ्यावे यावर सध्या तरी विचार झालेला नाही, असेही फळदेसाई यांनी पुढे सांगितले.

 नवीन दोन फेरीबोट पैकी एक जूनेगोवा ते दीवाडी व दुसरी चोडण ते रायबदर येथे कार्यरत असणार आहे. दोन वर्षात चार फेरीबोट आम्हाला मिळाल्या आहेत. येणाऱ्या ६ महिन्याच्या आत, आणखी दोन रो-रो फेरीबोट येणार असल्याने हा आखडा सहावर पोहचणार आहे. यातून ट्रॅफिकची समस्या सुटणार आहे, असे आमदार राजेश फळदेसाई यांनी सांगितले. 

 १ कोटी महसूल, तर खर्च ५० कोटी (चौकट करणे) 
राज्यात सुमारे १८ मार्गावर फेरीसेवा असून, एकूण ३५ फेरिबोट सेवा देत आहे. या संपूर्ण सेवेतून केवळ १ कोटी रुपये महसूल सरकारला मिळत आहे, तर ही सेवा देण्यासाठी सरकार ५० कोटी रुपये खर्च करत आहे, यातून स्पष्ट होते की केवळ लोकांची सेवा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.

सोलर फेरीबोटला, अल्प प्रतिसाद :

सोलर फरिबोटची आम्ही चाचणी करून पाहिली आहे. आकाराने लहान आहे, त्यामुळे या सोलर फेरोबोट सेवेला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आता या फेरिबोट केवळ पर्यटनसाठी सुरू करण्याचा प्रयत्न आहे. पण याबाबत ठोस निर्णय मात्र घेण्यात आलेला नाही, तसेच राज्यातील रॅम्प दुरुस्तीचे काम देखील लवकरच घेण्यात येईल. काही काम सार्वजनिक बांधकाम खात्याला यापूर्वीच दिले आहे, पण त्यांच्याकडे कामे खूप असल्याने, थोडाफार उशीर लागू शकतो, अशी माहिती देखील सुभाष फळदेसाई यांनी दिली.

Web Title: In the last two years four new boat have been provided for public service in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा