नव्या वर्षात गोमंतकीयांना बसणार वीज दरवाढीचा शॉक ?

By पूजा प्रभूगावकर | Published: December 20, 2023 01:30 PM2023-12-20T13:30:45+5:302023-12-20T13:30:54+5:30

वीज दरवाढीचा प्रस्ताव पाठवला जीईआरसीकडे

In the new year, people of Goa will get the shock of electricity price hike? | नव्या वर्षात गोमंतकीयांना बसणार वीज दरवाढीचा शॉक ?

नव्या वर्षात गोमंतकीयांना बसणार वीज दरवाढीचा शॉक ?

पणजी: गोवा वीज खात्याने वर्षात सलग तिसऱ्या वर्षी वीज बिलांत वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्ताव मंजुर झाला तर २०२४ - २५ या आर्थिक वर्षापासून ही वीज दरवाढ लागू होईल.त्यामुळे नव्या वर्षात वीज ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक बसण्याची शक्यता आहे.

वीज दरवाढीचा हा प्रस्ताव वीज खात्याने संयुक्त वीज नियमन आयोगाकडे (जेईआरसी)कडे पाठवले आहे. गोवा तसेच केंद्रशासीत प्रदेशांमधील वीज दरवाढीचा निर्णय हा जेईआरसी घेते. घरगुती व व्यवसायिक कमी दाबाच्या वीज ग्राहकांना ही वाढ लागू असेल.२०२३- २४ या आर्थिक वर्षात जेईआरसीने ५.२ टक्के वीज दरवाढ केली आहे. व्यवसायिक, ओद्यौगिक, हॉटेल व्यवसाय, कृषी क्षेत्र, सार्वजनिक विद्युतीकरण,हॉर्डिंग, साईनबोर्ड, इलैक्ट्रीक वाहन चार्जिंग स्टेशन यांना ही वीज दरवाढ लागू असेल. या वीज दरवाढीच्या माध्यमातून वीज खात्याला २०२४ - २५ या आर्थिक वर्षात ४७४.७ कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे.

Web Title: In the new year, people of Goa will get the shock of electricity price hike?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.