गोव्याच्या किनाऱ्यांवर विकेंडच्या गर्दीत; हरवलेल्या सात मुलांचे पुनर्मिलन
By किशोर कुबल | Updated: May 20, 2024 19:11 IST2024-05-20T19:10:29+5:302024-05-20T19:11:02+5:30
जीवरक्षकांची कामगिरी : पर्यटक पालकांचा जीव पडला भांड्यात

गोव्याच्या किनाऱ्यांवर विकेंडच्या गर्दीत; हरवलेल्या सात मुलांचे पुनर्मिलन
किशोर कुबल
पणजी : गोव्याच्या किनाऱ्यांवर विकेंडच्या गर्दीत हरवलेल्या सात मुलांचे जीवरक्षकांनी त्यांच्या पालकांशी पुनर्मिलन घडवून आणले.
उन्हाळी सुट्टीमुळे गोव्याचे किनारे पर्यटकांनी गजबजू लागले असून कुटूंब कबिल्यासह येथे येणाय्रा देशी पर्यटकांची तोबा गर्दी किनारपट्टीवर उसळत आहे. या गर्दीत लहान मुले हरवण्याचेही प्रकार घडतात.
दृष्टी लाइफ सेविंग कंपनीचे जीवरक्षक किनाऱ्यांवर बुडताना लोकांना वाचवण्याच सेवा देतात. या जीवरक्षकांनीच या सात हरवलेल्या मुलांना शोधून काढले. जानेवारीपासून गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर हरवलेल्या व नंतर त्यांच्या कुटूंबियांसोबत पुनर्मिलन झालेल्या लहान मुलांची एकूण संख्या ५८ झाली आहे.
कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर मुलांचे त्यांच्या पालकांशी पुनर्मिलन झाल्याची दोन वेगळी प्रकरणे नोंद झाली आहेत. कर्नाटकातील एक तीन वर्षांची मुलगी आणि नऊ वर्षांचा मुलगा हरवली होती त्यांना शोधून काढले. केपेत एक आठ वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांची मुलगी यांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांच्यहा स्वाधीन केले.
रविवारी सायंकाळी अचानक आलेल्या पावसामुळे मिरामार समुद्रकिनाऱ्यावर सात वर्षांचा मुलगा हरवला. पर्यटक पालकांनी या घटनेची माहिती लाईफगार्ड टॉवरवर गस्त घालणाऱ्या जीवरक्षकांना दिली. या मुलास नंतर शोधून काढले. पाळोळें गस्त घालणाऱ्या जीवरक्षकाला तीन वर्षांचा गोव्याचा मुलगा हरवला. त्याला शोधून आणले.
बागा किनाय्रावर केरळमधील एका व्यक्तीने आपली मुलगी जीवरक्षक टॉवरवर हरवल्याची तक्रार दिली.ती टॉवरपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर होती तिला शोधून आणले.
दरम्यान, जीवरक्षकांनी वेगवेगळ्या किनाय्रांवर पर्यटकांना बुडताना वाचवले. पाळोळें किनाऱ्यावर कर्नाटकातील तीन महाविद्यालयीन मुलींना बुडताना वाचवण्यात आले. दूधसागर येथे, हैदराबादमधील एक माणूस आणि त्याची तीन वर्षांची मुलगी खडकाळ भागातून घसरली आणि पाण्यात पडले. या दोघांनाही वाचवण्यात आले.