३ एप्रिलला वास्कोत चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य आणि वेशभूषा स्पर्धा
By पंकज शेट्ये | Published: March 28, 2024 08:32 PM2024-03-28T20:32:56+5:302024-03-28T20:33:06+5:30
आचारसहीतेमुळे वेगवेगळे नियम - मर्यादा लागू करून होईल स्पर्धा, रोमटामेळ स्पर्धा ठीक ४.३० वाजता वास्कोचे ग्रामदैवत देव दामोदराच्या मदीराबाहेरील परिसरातून सुरू होईल.
वास्को: मुरगाव तालुका नागरीक शिगमोत्सव समिती आणि गोवा पर्यटन विभागाने ३ एप्रिल रोजी वास्कोत चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य आणि वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. लोकसभा निवडणूकीमुळे आचारसहीता लागू असल्याने स्पर्धा आयोजित करताना वेगवेगळ्या अटी आणि मर्यादा लागू केली आहे. स्पर्धा संध्याकाळी ठीक ४ वाजता सुरू करून रात्री १० वाजता बंद करण्यात येईल. स्पर्धा वेळेत संपवण्यात यावी यासाठी फक्त १५ चित्ररथ, १० रोमटामेळ, १० लोकनृत्य आणि २० वेशभूषा स्पर्धकांना स्पर्धेत प्रवेश देण्यात येणार असून स्पर्धेत भाग घेण्याचा शेवटचा दिवस २ एप्रिल संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ठेवल्याची माहीती मुरगाव तालुका नागरीक शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष दिपेश प्रीयोळकर यांनी दिली.
गुरूवारी (दि.२८) मुरगाव तालुका नागरिक शिगमोत्सव समितीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वास्कोत ३ एप्रिला चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य आणि वेशभूषा स्पर्धा होणार असल्याची माहीती दिली. आचारसहीता लागू झाल्याने स्पर्धा विविध बंधने आणि मर्यादा लागू करून होणार असल्याची माहीती अध्यक्ष आणि मुरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिपेश प्रियोळकर यांनी दिली. ज्या गटांना स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी २ एप्रिल संध्याकाळी ५ पर्यंत त्यांच्या प्रवेशीका आयोजकांकडे सुपूर्द करणे बंधनकारक ठेवलेले आहे.
२ एप्रिलला संध्याकाळी ५ पर्यंत ठरवलेल्या संख्येपैक्षा जास्त स्पर्धकांच्या प्रवेशीका आल्यास चिठ्ठी (लोट्री) काढून चित्ररथ स्पर्धेत १५, रोमटामेळ १०, लोकनृत्य स्पर्धेत १० आणि वेशभूषा स्पर्धेत २० स्पर्धकांना प्रवेश देण्यात येईल. रोमटामेळ स्पर्धा ठीक ४.३० वाजता वास्कोचे ग्रामदैवत देव दामोदराच्या मदीराबाहेरील परिसरातून सुरू होईल. वेशभूषा स्पर्धा ४ वाजता तर लोकनृत्य स्पर्धा ४.३० वाजता वास्कोतील जोशी चौकसमोर घालण्यात येणाऱ्या व्यसपिठासमोर होईल. चित्ररथ स्पर्धेची सुरवात ५.३० वाजता सेंट ॲन्ड्रु चर्च समोरील परिसरातून होणार असल्याची माहीती दिपेश प्रियोळकर यांनी दिली. वेशभूषा स्पर्धेतील २० स्पर्धकांपैकी १० कनिष्ठ तर १० वरिष्ठ गटातील स्पर्धकांचा समावेश असणार. ठरवलेल्या वेळेत स्पर्धकाने सादरीकरण केले नसल्यास त्याला अपात्र ठरवला जाणार असल्याची माहीती दिपेश प्रियोळकर यांनी दिली. आचारसहीता लागू असल्याने स्पर्धकाने कुठल्याच राजकीय पक्षाचा अथवा राजकीय नेत्याची प्रसिद्धी करणारे चित्र लावू नये अथवा त्याबाबतचे सादरीकरणही करूनये असे दिपेश प्रियोळकर यांनी सांगितले.
दरम्यान शुक्रवारी ते मंगळवार पर्यंत मुरगाव तालुका नागरिक शिगमोत्सव समितीने मुरगाव पालिका इमारतीबाहेर घातलेल्या व्यासपिठावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहीती सहाय्यक सचिव संतोष खोर्जुवेकर यांनी दिली. शुक्रवार (दि.२९) संध्याकाळी ६ ते रात्री १० ह्या वेळेत व्यंकोजी वाघ ह्या मराठी नाटकाचे सादरीकरण होणार आहे. शनिवार (दि.३०) संध्याकाळी लहान मुलासाठी वेषभूषा आणि नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. रविवार (दि.३१) ‘लावणी क्वीन’ नावाच्या लावणी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सोमवार (दि.१) ‘रंग तरंग’ नावाच्या मराठी संगित - गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मंगळवार (दि.२) ‘ऑर्केस्ट्रा’ चे आयोजन केले आहे. बुधवारी (दि.३) संध्याकाळी ४ वाजल्यापासून वेषभूषा, लोकनृत्य, रोमटामेळ आणि चित्ररथ स्पर्धेला सुरवात होणार असल्याची माहीती खोर्जुवेकर यांनी दिली. मुरगाव तालुका नागरिक शिगमोत्सव समितीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेवेळी मनोज आर्सेकर, शेखर खडपकर, तारा केरकर, शैलेश गोवेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.