कोकणी नाटक संगीत अकादमीचा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कला मंदिरमध्ये उद्घाटन सोहळा
By आप्पा बुवा | Published: April 14, 2023 05:34 PM2023-04-14T17:34:23+5:302023-04-14T17:36:29+5:30
पंढरीनाथ परब सचिव तर विवेक पिसूर्लेकर खजिनदार आहेत.
गोमंतकीय कलाकारांनी एकत्र येऊन कोकणी नाटक संगीत अकादमीची स्थापना केली असून सदर अकादमी चे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते रविवार दिनांक 16 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता राजीव गांधी कला मंदिर मध्ये होणार आहे. सदर कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सिने कलाकार किशोर कदम (सौमित्र), कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, जलस्त्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर, वीज मंत्री सुदिन ढवळीकर, उपस्थित राहणार आहेत तर, खास निमंत्रित म्हणून ज्ञानपीठ कार दामोदर मावजो, फिल्म दिग्दर्शक जयप्रद देसाई, साहित्यकार उदय भेम्ब्रे, पुंडलिक नाईक, आदी उपस्थित राहणार आहेत.
संगीत नाटक अकादमीचे समिती काढण्यात आली असून अध्यक्षपदी श्रीधर कामत बांबोळकर यांची निवड झाली आहे तर डॉ.पूर्णानंद चारी हे उपाध्यक्ष आहेत. पंढरीनाथ परब सचिव तर विवेक पिसूर्लेकर खजिनदार आहेत. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ.रूपा चारी व शशिकांत पुणाजी हे करणार आहेत.एड.उदय भेम्ब्रे, पुंडलिक नायक, सुनिता गावणेकर, माया गवडंळकर यांना अकादमीचे मानद सदस्यत्व देण्यात येणार आहे. रामदास नायक यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी होणार आहे.
उद्घाटनपर कार्यक्रम झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून कटमगाळ दादा पंगड बांदिवडे हे गणेश वंदना आणि गोमंतकीय लोकनृत्य सादर करतील. आतिश कालापूरकर व साथी यांचे कोकणी भजन होईल. पूर्णानंद चारी, शिरीष लवंदे, शकुंतला भरणे हे कोकणी सुगम संगीत सादर करतील. बोरी येथील श्री शिंवी प्रसादिक नाट्य मंडळ संगीत सौभद्र नाटकातील प्रवेश सादर करतील. ह्या वेळेस विविध नाटकातील प्रवेश वेगवेगळे कलाकार सादर करतील. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.तन्वी कामत बांबोळकर ,सुरज कोमरपंत व जाॅन आगियार करणार आहेत.