'अपघात घडताच दहा मिनिटांत पोहचा', गोव्यात 20 दुचाकी रुग्णवाहिकांचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 12:49 PM2018-02-08T12:49:46+5:302018-02-08T12:50:12+5:30

आरोग्य खात्यातर्फे गुरुवारी एकूण 20 दुचाकी रुग्णवाहिकांचे उद्घाटन करण्यात आले.

Inauguration of two-wheeler ambulances in Goa | 'अपघात घडताच दहा मिनिटांत पोहचा', गोव्यात 20 दुचाकी रुग्णवाहिकांचे उद्घाटन

'अपघात घडताच दहा मिनिटांत पोहचा', गोव्यात 20 दुचाकी रुग्णवाहिकांचे उद्घाटन

Next

पणजी : राज्यात कुठेही अपघात घडल्यानंतर जखमींपर्यंत दहा मिनिटांत पोहचता यावे व त्यास प्रथमोपचार देण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आरोग्य खात्यातर्फे गुरुवारी एकूण 20 दुचाकी रुग्णवाहिकांचे उद्घाटन करण्यात आले. येत्या वर्षी अशा प्रकारच्या शंभर रुग्णवाहिका गोव्यातील रस्त्यांवरून धावतील एवढी व्यवस्था केली जाईल असे सरकारतर्फे उद्घाटन सोहळ्य़ानंतर जाहीर करण्यात आले.
ईएमआरआर 108 रुग्णवाहिका सेवेखाली गोव्यातील रस्त्यांवरून रुग्णवाहिका धावतातच. त्या शिवाय आता 108 सेवेखालीच वीस दुचाकी रुग्णवाहिकाही रस्त्यावरून धावण्यास गुरुवारी आरंभ झाला.  फस्ट रिस्पॉन्स  रुग्णवाहिका म्हणून त्या ओळखल्या जातात. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते या आधुनिक पद्धतीच्या दुचाकी रुग्णवाहिकांचे उद्घाटन करण्यात आले. पर्वरी येथील सचिवालयाजवळ उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. दुचाकी रुग्णवाहिकांकडे ऑक्सिजन मास्क, ऑक्सिजन सिलिंडर व अन्य प्राथमिक उपकरणे आहेत. एखाद्या अपघातग्रस्ताला दहा मिनिटांत प्रथमोपचार देता यावेत अशी व्यवस्था केली गेली आहे. केवळ वीस रुग्णवाहिका पूर्ण गोव्यासाठी पुरेशा नाहीत. उसगावमधील एका कंपनीही आणखी 25 दुचाकी रुग्णवाहिका पुरस्कृत करणार आहे. एकूण शंभर दुचाकी येत्या वर्षी गोव्यातील रस्त्यांवरून धावतील असे जाहीर करण्यात आले. आरोग्य खात्याचे तसेच ईएमआरआर सेवेचे अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नारळ फोडून व हिरवा बावटा दाखवून दुचाकी रुग्णवाहिकांचे उद्घाटन केले गेले.
एका दुचाकी रुग्णवाहिकेच्या खरेदीसाठी एक ते दीड लाख रुपयांचा खर्च येतो. दुचाकीस्वारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. दुचाकीवरून रुग्णाला आणले जाणार नाही पण प्रथमोपचार तातडीने मिळाल्यानंतचार चाकी रुग्णवाहिकांमध्ये घालून रुग्णाला इस्पितळात नेले जाईल. मुख्यमंत्री र्पीकर म्हणाले, की वाहतूक कोंडीची समस्या, अरुंद रस्ते तसेच अन्य समस्यांवर मात करत दुचाकी रुग्णवाहिका अपघातग्रस्त रुग्णार्पयत लवकर पोहचतील. मोठय़ा रुग्णवाहिकांना पोहचण्यास काहीवेळा विलंब लागतो. तोर्पयत दुचाकी घटनास्थळी पोहचतील. केवळ किनारी भागातच नव्हे तर सगळीकडेच दुचाकी रुग्णवाहिकांची गरज असते. जिथे जास्त अपघात होतात अशा ठिकाणी प्रथम दुचाकी रुग्णवाहिका उपलब्ध केल्या जातील.
दरम्यान, हृदयरोगविषयक उपचारांची व्यवस्था असलेल्या पाच विशेष रुग्णवाहिकाही तयार करण्यात आल्या आहेत. येत्या तीन दिवसांत त्यांचेही उद्घाटन केले जाणार आहे. पाच विशेष रुग्णवाहिकांवर प्रत्येकी एक डॉक्टर उपलब्ध असेल. एखाद्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्या रुग्णार्पयत ह्या रुग्णवाहिका पोहचतील. त्यास प्रथमोपचार दिले जातील व मग इस्पितळात नेले जाईल. प्रथमोपचारांअभावी काहीवेळा रुग्ण इस्पितळात पोहचण्यापूर्वीच मरण पावत असतात.
 

Web Title: Inauguration of two-wheeler ambulances in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा