गँगवॉरमध्ये पंजा कापला गेलेल्याचा मृत्यू, खुनाचा गुन्हा नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 02:44 PM2019-07-10T14:44:33+5:302019-07-10T14:44:41+5:30
गोव्यात गुंडगिरीला किती ऊत आला आहे, याचे ताजे उदाहरण म्हणजे जुने गोवा येथे झालेले कोयता व दगड घेऊन झालेले गँगवॉर.
पणजी: जुने गोवे गँग वॉर मध्ये हात कापला गेलेला युवक कृष्णा कुट्टीकर याचे गोमेकॉत निधन झाले. अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरचे म्हणणे आहे. या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंदला गेला आहे.
गोव्यात गुंडगिरीला किती ऊत आला आहे, याचे ताजे उदाहरण म्हणजे जुने गोवा येथे झालेले कोयता व दगड घेऊन झालेले गँग वॉर. या हल्ल्यात कृष्णा कुट्टीकर याचा हाताचा पंजा कापला गेला होता. गोमेकॉत दाखल करून त्याच्यावर उपचारही चालविले होते. रक्तवाहिनी तुटल्या गेल्यामुळे त्याचा खूप रस्तस्त्राव झाला होता. त्यामुळे त्याची प्रकृती खूपच खालावली होती. मंगळवारी रात्री त्याची प्रकृती खूपच चिंताजनक बनली होती आणि बुधवारी दुपारी त्याचे निधन झाले. गोमेकॉतील सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली.
कुट्टीकर याच्या निधनामुळे या प्रकरणाला आता हे प्रकरण गांभिर्यामने घेणे पोलिसांना आणि प्रशासनालाही भाग आहे. स र्व चारही संशयितांवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मुळ एफआयआरमध्ये खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. गँगवॉरची सुरूवात झाली होती ताळगाव येथे व तेथे चारही संशयितांनी तक्रारदाराच्या गटातील युवकांवर हल्ला करून ते रायबंदरच्या दिशेने पळाले होते. त्यानंतर या युवकांनी त्यांचा पाठलाग केला होता.
रायबंदर येथे त्यांना संशयितांकडून अडवून कोयता व दगड घेऊन त्यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यातच कृष्णा कुट्टीकर याच्यावर कोयत्याचा वार करण्यात आला व तो त्याच्या हाताच्या पंजावर पडला आणि पंजा कापला गेला होता. हल्लेखोरांची नावे जॅक ऊर्फ मानुएल ओलिवेरा, कमलेश कुंडईकर, मनिष हडफडकर आणि गौरिश बांदोडकर अशी आहेत. गौरिशला पणजी पोलिसांनी तर इतर तिघांना जुने गोवा पोलिसांनी अटक केली आहे. सर्वांना ८ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.