गोव्यात कृषी पर्यटन वाढीस लावा - भाजप आमदाराची विधानसभेत मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2016 08:01 PM2016-08-03T20:01:27+5:302016-08-03T20:01:27+5:30
गोव्यात कृषी पर्यटन सरकारने वाढीस लावायला हवे, अशी मागणी पणजीचे भाजप आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांनी बुधवारी विधानसभेत केली.
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ३ - गोव्यात कृषी पर्यटन सरकारने वाढीस लावायला हवे, अशी मागणी पणजीचे भाजप आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांनी बुधवारी विधानसभेत केली.
कृषी, पशू संवर्धन, राजभाषा, वीज आदी खात्यांशीसंबंधित अनुदानित मागण्यांवरील चर्चेवेळी ते बोलत होते. कृषी पर्यटनास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने काही कायदेही करावेत. राज्यात कृषी निर्यात हब तयार होण्याचीही गरज आहे. कृषी हब तयार झाल्यास त्याचा लाभ गोव्यासह महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, कोल्हापुर तसेच कर्नाटकमधील बेळगाव, कारवार वगैरे भागांनाही होईल, असे कुंकळ्ळ्य़ेकर म्हणाले. खासदार नरेंद्र सावईकर यांनीही ही मागणी लोकसभेत मांडलेली असून केंद्रीय मंत्र्यांनी ती मान्यही केल्याचे कुंकळ्ळ्य़ेकर यांनी नमूद केले.
आमच्या सरकारने माडाला गवताचा दर्जा दिलेला नाही. विरोधकांमधील काहीजण उगाच तसा अपप्रचार करत आहेत. त्यावरून यात्रही काढत आहेत, अशी टीका कुंकळ्ळ्य़ेकर यांनी केली. कर्नाटकच्या तुलनेत गोव्यात घरगुती व व्यवसायिक वापराच्या वीजेचा दर बराच कमी आहे, असे कुंकळ्ळ्य़ेकर आकडेवारी देऊन म्हणाले.
दरम्यान, लोकांना योजनांची माहिती मिळावी म्हणून कृषी खात्याने एक पुस्तिका छापावी व त्याचे वितरण शेतक:यांमध्ये करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणो यांनी केली. खात्याच्या अधिका:यांनी कार्यालयात बसून राहू नये, त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करावी, असे राणे म्हणाले.