‘पे पार्किंग’चे जास्त शुल्क आकारल्याच्या वाढत्या तक्रारी

By admin | Published: May 28, 2016 02:38 AM2016-05-28T02:38:25+5:302016-05-28T02:38:25+5:30

पणजी : शहरात ‘पे पार्किंग’साठी निर्धारित शुल्कापेक्षा जास्त शुल्क मागितले जात असल्याच्या वाढत्या तक्रारी महापालिका

Increasing compliance of 'pay parking' charges | ‘पे पार्किंग’चे जास्त शुल्क आकारल्याच्या वाढत्या तक्रारी

‘पे पार्किंग’चे जास्त शुल्क आकारल्याच्या वाढत्या तक्रारी

Next

पणजी : शहरात ‘पे पार्किंग’साठी निर्धारित शुल्कापेक्षा जास्त शुल्क मागितले जात असल्याच्या वाढत्या तक्रारी महापालिका आयुक्तांकडे येऊ लागल्याने जनतेच्या माहितीसाठी मनपाने पुन्हा एकदा दर जाहीर केले आहेत.
अशा तक्रारी असल्यास त्या आपल्या निदर्शनास आणाव्यात, असे आवाहन आयुक्त दीपक देसाई यांनी केले आहे. चारचाकींसाठी चार तासांहून कमी वेळेकरिता १0 रुपये, ४ ते १२ तासांकरिता १५ रुपये आणि १२ ते २४ तासांकरिता २0 रुपये निश्चित करण्यात आले आहेत. दुचाकींसाठी चार तासांहून कमी वेळेकरिता ४ रुपये, ४ ते १२ तासांकरिता ८ रुपये आणि १२ ते २४ तासांकरिता १५ रुपये निश्चित करण्यात आले आहेत.
वरील दरांपेक्षा अधिक शुल्क आकारले जात असल्यास आयुक्तांकडे तक्रार केली जावी, असे आवाहन आहे. मिळालेल्या माहितीनुसार चारचाकींसाठी काही ठिकाणी थेट ३0 रुपये मागितले जातात तसेच टॅक्सीवाले पार्किंग शुल्क भरण्यास नकार देतात, अशा तक्रारी आयुक्तांकडे पोचलेल्या आहेत. टॅक्सीवाल्यांनाही हे शुल्क भरावे लागेल, असे देसाई यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)

Web Title: Increasing compliance of 'pay parking' charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.