गोव्यात मधुमेहाचे वाढते प्रमाण,  दीड वर्षात १0 हजार नव्या रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 01:02 PM2017-12-19T13:02:03+5:302017-12-19T15:32:42+5:30

गोव्यात मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले असून अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या दीड वर्षाच्यो काळात सरकारी इस्पितळांमध्ये मधुमेहाने ग्रस्त १0 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

 Increasing number of diabetes in Goa, 10 thousand new cases | गोव्यात मधुमेहाचे वाढते प्रमाण,  दीड वर्षात १0 हजार नव्या रुग्णांची नोंद

गोव्यात मधुमेहाचे वाढते प्रमाण,  दीड वर्षात १0 हजार नव्या रुग्णांची नोंद

googlenewsNext

पणजी : गोव्यात मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले असून अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या दीड वर्षाच्यो काळात सरकारी इस्पितळांमध्ये मधुमेहाने ग्रस्त १0 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तसेच सरकारी इस्पितळांमध्ये मोफत इन्सुलिन उपलब्ध करण्याचा सरकारचा विचार आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार २0१६-१७ या आर्थिक वर्षात ६२४१ तर गेल्या एप्रिलपासून सप्टेंबरअखेरपर्यंत ३५0७ मधुमेहाचे नवे रुग्ण सापडले.

२0१६-१७ मध्ये जुन्या मधुमेहींपैकी ९६,२२१ रुग्ण पुढील उपचार घेण्यासाठी इस्पितळांमध्ये आले. तर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ४५,१५६ रुग्णांनी पुढील उपचार घेतले. लोकांमध्ये जागृती वाढलेली आहे तसेच झटपट निदानाचीही सोय झालेली आहे त्यामुळे अधिकाधिक रुग्ण उघडकीस येत आहेत. वेगवेगळ्या आरोग्य केंद्रांमध्ये असंसर्गजन्य रोगांबाबतही नियमितपणे स्क्रीनिंग होत असते. त्यातूनही बरेच रुग्ण आढळून आलेले आहेत. सरकारी इस्पितळांमध्ये मधुमेहावरील उपचार मोफत केले जातात.

प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून तसेच सामाजिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून जागृती घडवून आणली जात आहे त्याचा बराच फायदा दिसून आलेला आहे. डॉक्टरांच्या मते बदलती जीवनशैली हेच मधुमेहाचे प्रमुख कारण आहे. सरकारच्या डायाबिटीस रजिस्ट्रीमध्ये सरकारी इस्पितळांबरोबरच राज्यातील आरोग्य केंद्रे व इतर इस्पितळांच्या रुग्णांची नोंद होत असते. तूर्त अवघ्याच सरकारी इस्पितळांमध्ये इन्सुलिन मोफत दिले जाते. ही सोय आता राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच सरकारी इस्पितळांमध्ये केली जाणार आहे.

तीन वर्षात ३३४५ जणांना सर्पदंश

दरम्यान, अन्य एका आकडेवारीवरुन असे स्पष्ट झाले आहे की, राज्यात गेल्या तीन वर्षांच्या काळात ३३४५ जणांना सर्पदंश झाला. चालू आर्थिक वर्षातच पहिल्या सहा महिन्यांच्या कालावधीत ९६0 सर्पदंशाची प्रकरणे नोंद झाली. २0१५ साली १२४९ तर २0१६ साली ११३६ सर्पदंशाची प्रकरणे नोंद झाली.

Web Title:  Increasing number of diabetes in Goa, 10 thousand new cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.