अपक्ष आमदारांना हवाय पक्षाचा आधार
By admin | Published: May 21, 2015 01:26 AM2015-05-21T01:26:24+5:302015-05-21T01:26:33+5:30
पणजी : २०१२ सालच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या पाच अपक्ष आमदारांपैकी काही आमदार २०१७च्या निवडणुकीसाठी एखाद्या प्रबळ
पणजी : २०१२ सालच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या पाच अपक्ष आमदारांपैकी काही आमदार २०१७च्या निवडणुकीसाठी एखाद्या प्रबळ राजकीय पक्षाच्या शोधात आहेत. निवडणुकीवेळी आपण एखाद्या प्रस्थापित राजकीय पक्षाची वाट धरावी की, ‘थर्ड फ्रंट’च्या रूपात वेगळा राजकीय पक्ष जन्मास घालावा, याविषयी अपक्ष आमदारांमध्ये खल सुरू आहे.
२०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीसाठी पावणेदोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. शेवटच्या सहा महिन्यांत मोठे राजकीय नियोजन करता येत नाही. ते दिवस धावपळीचेच असतात. त्यामुळे आपली पुढील राजकीय रणनीती कशी असावी, याबाबत आताच नियोजन करावे लागत आहे. काही अपक्ष आमदारांच्या अलीकडे अनौपचारिक बैठका होत आहेत. तसेच विविध सोहळ्यांनिमित्त हे आमदार एकमेकाला भेटतात, तेव्हाही तिसरा राजकीय पर्याय निर्माण करूया, अशा प्रकारची चर्चा त्यांच्यात होते. सत्ताधारी भाजप व विरोधी काँग्रेसलाही कंटाळलेले जे मतदार आहेत, त्यांना जवळ करण्यासाठी ‘थर्ड फ्रंट’ हा पर्याय असल्याचे काही अपक्ष आमदारांचे पक्के मत बनले आहे. मात्र, एखादा नवा राजकीय पक्ष स्थापन करण्यास व त्याला निवडणूक आयोगाची मान्यता मिळण्यास किमान एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे राज्यात अस्तित्वात असलेल्याच एखाद्या तिसऱ्या राजकीय पक्षाची आपण कास धरून(पान २ वर)