गोव्याचे आमदार रोहन खंवटे यांना अटक आणि सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 10:56 AM2020-02-06T10:56:08+5:302020-02-06T11:00:08+5:30
गोव्याचे माजी महसुल मंत्री आणि पर्वरी मतदारसंघाचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना बुधवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांनी अटक केली.
पणजी - गोव्याचे माजी महसुल मंत्री आणि पर्वरी मतदारसंघाचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना बुधवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांनीअटक केली. भाजपाचे प्रवक्ते प्रेमानंद म्हांबरे यांना धमकी दिल्या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी खंवटे यांना अटक करून पहाटे जामिनावर त्यांची सुटका केली. गोवा विधानसभेचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन काळात आमदाराला अशा कथित धमकी प्रकरणी अटक होण्याची ही गोव्यातील अलिकडील काळातील पहिलीच वेळ आहे.
आपण विधानसभा प्रकल्पात बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री सावंत यांना भेटण्यासाठी गेलो असता, आमदार रोहन खंवटे यांनी प्रकल्पातील वाटेतच आपल्याला धमकावले अशी तक्रार भाजपाचे प्रवक्ते प्रेमानंद म्हांब्रे यांनी बुधवारी रात्री पोलिसांत केली होती केली होती.आपण पत्रकार परिषद घेऊन आमदार खंवटे यांच्या मालमत्तांविषयी बोललो होतो. ते पणजीतील त्यांच्या कंपन्यांच्या कार्यालयाबाबत महापालिकेला फक्त पाचशे रुपये कर भरतात असे मी म्हटले होते. याविषयी खंवटे यांनी मला धमकावले. माझा हात त्यांनी पकडला व तुमच्या आईवडिलांपासूनच्या मालमत्ता मी पाहून घेतो असे खंवटे मला बोलले अशी तक्रार म्हांब्रे यांनी सभापतींकडे केली व पोलिसांतही धाव घेतली होती.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी रात्री पत्रकार परिषद घेऊन व खंवटे यांच्याविरुद्ध सरकारने कारवाई करावी अशी मागणी केली होती. खवटे यांची दादागिरी जास्त झाली म्हणूनच त्याना मंत्रिमंडळातून अलिकडेच वगळण्यात आल्याचे तानावडे म्हणाले होते. भाजपाचा आक्रमक पवित्रा पाहता खंवटे यांना पोलीस अटक करतील असे संकेत मिळू लागले होते. सभापतींच्या परवानगीनंतर पोलिसांकडून रात्री उशिरा खंवटे यांना अटक झाली. आज गुरुवारी अधिवेशनात हा विषय गाजण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
हिरे उद्योगाला 'कोरोना'चा फटका; 8000 कोटींचे नुकसान होण्याची शक्यता
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करणं ही मोदींची घातक चूक - इम्रान खान
'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्टला मिळालं पहिलं दान, मोदी सरकारनं दिला एक रूपया!
विचित्र अपघात; रनवेवर उतरताना विमानाचे तीन तुकडे झाले
महिला अत्याचारविरोधी कठोर कायदा राज्यातही; आंध्रच्या ‘दिशा’चे अनुकरण