मोदींच्या नेतृत्वाखाली भारत वैभवाच्या शिखरावर; गोव्याचाही कायापालट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 01:10 PM2023-12-24T13:10:40+5:302023-12-24T13:12:20+5:30

मुख्यमंत्री साखळीत विकसित भारत संकल्प यात्रेला मोठा प्रतिसाद

India at peak of glory under Modi; | मोदींच्या नेतृत्वाखाली भारत वैभवाच्या शिखरावर; गोव्याचाही कायापालट

मोदींच्या नेतृत्वाखाली भारत वैभवाच्या शिखरावर; गोव्याचाही कायापालट

विशांत वझे

डिचोली- दहा वर्षांच्या कालावधीत मोदींच्या सक्षम मार्गदर्शनाखाली भारत देश वैभवाच्या  शिखरावर पोचलेला असून गोवा राज्याचाही सर्वांगीण कायापलट होत आहे. स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारले जात असून प्रत्येक घरात समृध्दी येत आहे. गोव्यासाठी मोठी उपलब्ध साधताना आत्मनिर्भर गोव्याची वाटचाल पूर्ण यशस्वी केली आहे. सर्वच क्षेत्रात मोदींनी प्रगती साधताना देशाचा विश्वास सापडणं केलेला असून पुन्हा एकदा देशाचे नेतृत्व करण्याची पूर्ण तयारी केलेली असून सारा भारत त्यांच्या पाठीशी उभा आसल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ .प्रमोद सावंत यांनी केले.

साखळी पालिका  क्षेत्रात विकसित भारत  संकल्प यात्रेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महिला कल्याण, किसान,गरीब कल्याण अंतर्गत सर्वच घटकांचा विकास झाला. हजारो योजना अखून गरीब ते गरजू अश्या सर्वच घटकांचे जीवन समृध्द करण्यात मोदीजी नी मोठे योगदान दिले. अंतोद य,  ग्रा मो द य,सर्वोदय. पातळीवर विकासाला मोठी चालना मिळाली.घरे,वीज पाणी आदी सुविधा परिपूर्ण केल्या .गोव्याचा कायापालट करताना सर्वच विभागात मोठी उपलब्धि साधलेली असून  गोवा,भारत आज  विकासाच्या v समृद्धीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगीतले.

केंद्रीय अधिकारी डॉ पवन कुमार यानी  राज्यात अनेक क्षेत्रात मोठे बदल घडून आलेले असून मोठी विकास क्रांती झाल्याचे स्पष्ट केले.नगराध्यक्ष रश्मी देसाई यांनी मोदीजी व डॉ प्रमोदजी सावंत यांच्या मुळे विकासाला मोठी चालना  मिळाल्याचे स्पष्ट केले 
या  संकल्प यात्रेत. मुलांनी पथनाट्य तसेच ढोल वादन करून  रंगत आणली.आरोग्य शिबीर तसेच विविध सरकारी योजनांची माहिती व तातडीने. विकासच्या योजनांना मंजुरी देणे या साठी सरकारी अधिकाऱ्यांनी दालने थाटली होती त्याला मोठा प्रतिसाद लाभला.या वेळी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.उपनगराध्यक्ष आनंद काणेकर सर्व नगरसेवक ,मुख्याधिकारी कबीर शिरगावकर ,आरोग्य खात्याचे अधिकारी सरकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: India at peak of glory under Modi;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.