गोव्यात ६  फेब्रुवारीला भारत ऊर्जा सप्ताह २०२४ चे आयोजन 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 05:13 PM2023-12-22T17:13:17+5:302023-12-22T17:13:36+5:30

१०० पेक्षा जास्त देशांमधून ३५ हजार प्रतिनिधी सहभागी होणार

India Energy Week 2024 organized on February 6 in Goa | गोव्यात ६  फेब्रुवारीला भारत ऊर्जा सप्ताह २०२४ चे आयोजन 

गोव्यात ६  फेब्रुवारीला भारत ऊर्जा सप्ताह २०२४ चे आयोजन 

पणजी: डायनेमिक अँड व्हायब्रेट गोवातर्फे राज्याच्या दक्षिण भागातील आयपीएसएचईएम-ओएनजीसी ट्रेनिग इन्स्टिट्यूटमध्ये ६ ते ९ फेब्रुवारी दरम्यान  इंडिया एनर्जी वीक (आयईडब्ल्यू) २०२४ च्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दक्षिण गोव्यातील बेतुल येथे होणार आहे, अशी माहिती पीआयबीचे महासंचालक राजीव जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.  यावेळी त्यांच्या सोबत ओएनजीसी कार्यकारी संचालक संजीव सिंघल, एफआयपीआयचे महासंचालक गुरमीत सिंग व इतर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उ‌द्घाटन झालेल्या या वर्षाच्या सुरुवातीला आयईडब्ल्यूने पहिल्या आवृत्तीत प्रचंड यश मिळविले. आपल्या लोकांसाठी ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करताना आयईडब्ल्यू २०२३ च्या भव्य कार्यक़्रमाला १४९ देशांमधील सुमारे ३७ हजार उपस्थितांसह एक अग्रगण्य ऊर्जा कार्यक्रम म्हणून याची पुष्टी केली. शिवाय ३२६ कंपन्यांनी प्रदर्शनामध्ये भाग घेतला आणि ३१५ वक्त्यांनी ८० हून अधिक कॉन्फरन्स सत्रांमध्ये भाग घेतला, अशी माहिती पीआयबीचे महासंचालक राजीव जैन यांनी दिली. 

ओएनजीसी कार्यकारी संचालक संजीव सिंघल म्हणाले, भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अधिपत्याखाली फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम (एफआयपीआय) इंडस्ट्रीने आयोजित केलेला भारतीय ऊर्जा सप्ताह, २०२४ उद्योग तज्ज्ञ, धोरण निति, शैक्षणिक आणि उद्योजक यांच्यात अर्थपूर्ण चर्चा, ज्ञानाची देवाणघेवाण आणि सहकार्यासाठी प्रेरक म्हणून काम करेल.

आयईडब्ल्यू २०२४ मध्ये १०० हून अधिक देशांमधून ३५ हजार उपस्थित, ३५ प्रदर्शक, ४०० वक्ते आणि ४ हजार प्रतिनिधी येण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमात कोअर ऑईल फिल्ड सर्व्हिसेस, वातावरणाला गतिमानता देणारे अनेक प्रदर्शक उपस्थित राहणार आहेत.

Web Title: India Energy Week 2024 organized on February 6 in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा