भारत हा क्रीडा क्षेत्रातील उभरता तारा, दक्षिण अफ्रिकेचा प्रसिध्द क्रिकेटपटू जाँन्टी ऱ्होड्सनं केलं कौतुक

By समीर नाईक | Published: November 2, 2023 04:21 PM2023-11-02T16:21:52+5:302023-11-02T16:22:29+5:30

जाँन्टी ऱ्होड्स सध्या गोव्यात स्थायिक झाला असून, बुधवारी त्याने आपल्या पत्नीसोबत कांपाल येथे सुरु असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या सामन्यांना भेट दिली.

India is a rising star in the field of sports, South Africa's famous cricketer Jonty Rhodes praised | भारत हा क्रीडा क्षेत्रातील उभरता तारा, दक्षिण अफ्रिकेचा प्रसिध्द क्रिकेटपटू जाँन्टी ऱ्होड्सनं केलं कौतुक

भारत हा क्रीडा क्षेत्रातील उभरता तारा, दक्षिण अफ्रिकेचा प्रसिध्द क्रिकेटपटू जाँन्टी ऱ्होड्सनं केलं कौतुक

        
पणजी: भारत हा क्रीडा क्षेत्रातील उभारता तारा आहे. क्रिकेट सोबत इतर खेळातही भारत खुप पुढे आहे. याचे श्रेय ताळागाळात खेळाडू तयार करण्यावर भर देणाऱ्या क्रीडामंत्र्यांना जाते. येथे सरकार खेळाडूंपर्यंत पाेहचते, खेळाडू सरकारपर्यंत नाही, त्यामुळेच देशाने प्रत्येक खेळात स्टार खेळाडू तयार केले आहेत, असे मत दक्षिण अफ्रिकेचा प्रसिध्द क्रिकेटपटू जाँन्टी ऱ्होड्स यांनी व्यक्त केले.

जाँन्टी ऱ्होड्स सध्या गोव्यात स्थायिक झाला असून, बुधवारी त्याने आपल्या पत्नीसोबत कांपाल येथे सुरु असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या सामन्यांना भेट दिली. यावेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी ऱ्होड्स दांपत्याचे स्वागत केले. तसेच त्यांचा पाहुणचारही केला.

भारतात जास्त लक्ष्य क्रिकेटवर केंद्रीत केले जाते, परीणामस्वरुप भारताकडे एकापेक्षा एक दर्जेदार पुरुष व महिला क्रिकेट तयार झाले आहे. आता देशात राहिल्यावर इथली क्रीडा संस्कृती जवळहून पाहायला मिळाली. ज्या प्रकारे येथेे क्रीडा क्षेत्र विकसीत करण्यासाठी काम केले जाते, ते खुप उल्लेखनीय आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा त्यापैकी एक. या स्पर्धांमुळे युवा खेळाडूंना एक चांगले व्यासपिठ मिळते, तसेच यातून भविष्यातील खेळाडू तयार होते, हेही अत्यंत महत्वाचे आहे, असे ऱ्होड्स यांनी यावेळी सांगितले.

गोव्याबद्दल सांगायचे झाले तर मी माझे नविन घर केले आहे. येथे लोकांचे भरभरुन प्रेम मिळाले. येथील वातावरणात खुप प्रसन्न वाटते. मला येथे स्थायिक होऊन खुप आनंद होत आहे. मी व माझे कुटूंबीय नेहमीच क्रीडा क्षेत्रात रमत असतो, त्यामुळे येथील क्रीडापटूंना व खासकरुन क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्याचे भाग्य लाभल्यास मी निश्चितच हे करणार आहे, असे ऱ्होड्स यांनी सांगितले.

 ऱ्होड्सच्या उपस्थितीने वनचैतन्य: क्रीडामंत्री गोविंद गावडे 
क्रीडामंत्री म्हणून ऱ्होड्स कुटूंबीयाचे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्वागत करताना खुप आनंद होत आहे. ऱ्होड्सच्या उपस्थितीने वनचैतन्य तयार झाले आहे. गोमंतकीयांसाठी हा अभिमानस्पद गोष्ट आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे खेळाडूंना देखील चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळणार आहे, असे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी यावेळी सांगितले.
 

Web Title: India is a rising star in the field of sports, South Africa's famous cricketer Jonty Rhodes praised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा