खवळलेल्या समुद्रातून आर्मी अधिका-याची चित्तथरारक सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 07:40 PM2019-06-13T19:40:19+5:302019-06-13T19:44:36+5:30

गोव्यातील फेसाळता समुद्र पहाताना दगडावरुन पाय घसरुन पाण्यात पडलेले लेफ्टनंट शिवम या 26 वर्षीय आर्मी अधिका-याला शेवटी तटरक्षक दलाच्या हॅलीकॉप्टरच्या सहाय्याने वाचविण्यात आले.

Indian Coast Guard rescued a man from drowning | खवळलेल्या समुद्रातून आर्मी अधिका-याची चित्तथरारक सुटका

खवळलेल्या समुद्रातून आर्मी अधिका-याची चित्तथरारक सुटका

Next

 मडगाव - गोव्यातील फेसाळता समुद्र पहाताना दगडावरुन पाय घसरुन पाण्यात पडलेले लेफ्टनंट शिवम या 26 वर्षीय आर्मी अधिका-याला शेवटी तटरक्षक दलाच्या हॅलीकॉप्टरच्या सहाय्याने वाचविण्यात आले. सदर अधिकारी मूळ अंबाला-हरियाणा येथील असून पुण्यात त्याचे पोस्टींग करण्यात आले होते. पुण्यातून तो गोव्यात आला असता गुरुवारी दुपारी ही दुर्घटना काब द राम येथे घडली.

गोवा तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक हिमांशु नौटीयाल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या दुर्घटनेत हा अधिकारी काहीसा जखमी झाल्यामुळे त्याला तातडीने वास्कोतील नौदलाच्या जीवंती  रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. तटरक्षक दलाच्या या धाडसी मोहिमेत लेफ्ट. कर्नल ऋषी शर्मा (पायलट) व डेप्यूटी कमाडंट विश्व जीत सिंग यांनी मोलाची कामगिरी बजावली. हेलिकॉप्टरमधून पाण्यात दोर सोडून या अधिका:याला वर काढण्यात आले.





मिळालेल्या माहितीप्रमाणे, दुपारी एकच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. सध्या वादळी हवामानामुळे दर्या खवळलेला असून काब द राम येथे मोठय़ा लाटा उसळत होत्या. पर्यटकांनी समुद्रावर जाऊ नये असा इशारा दिलेला असतानाही सदर अधिकारी या किना-यावरील दगडावर चढला. यावेळी पाय घसरल्याने तो पाण्यात पडला.

त्याला वाचविण्यासाठी किना-यावरील जीवरक्षक जवानांनी जेटस्की पाण्यात घालण्याचा प्रयत्न केला मात्र सगळी जागा खडकाळ असल्यामुळे आणि जोराच्या लाटा येत असल्यामुळे हा प्रयत्न सोडून देण्यात आला. सुरक्षेचा उपाय म्हणून वरिष्ठ जीवरक्षक अमिताव याने रेस्क्यू टय़ूब पाण्यात सोडला आणि त्यावर चढण्याचा आदेश त्याला दिला. त्यानंतर लगेच तटरक्षक दलाशी तसेच कुंकळ्ळी पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.

तटरक्षक दलाला या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शोधासाठी चेतक हॅलिकॉप्टर तातडीने पाठविले. ढगाळ वातावरण आणि कमी प्रकाश असतानाही ते हेलिकॉप्टर तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ हॅलिकॉप्टरमधून पाण्यात दोर सोडून खवळलेल्या दर्यातून त्याची सुटका केली.




 

Web Title: Indian Coast Guard rescued a man from drowning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.