‘उद्योगमंत्री चले जाव!’
By admin | Published: July 26, 2015 02:38 AM2015-07-26T02:38:34+5:302015-07-26T02:38:46+5:30
पणजी : उद्योगमंत्री महादेव नाईक यांनी सरकारकडून फ्लॅट खरेदी करण्यासाठी अल्प व्याजाने कर्ज घेतले आणि प्रत्यक्षात त्या पैशांमधून चार
पणजी : उद्योगमंत्री महादेव नाईक यांनी सरकारकडून फ्लॅट खरेदी करण्यासाठी अल्प व्याजाने कर्ज घेतले आणि प्रत्यक्षात त्या पैशांमधून चार दुकाने खरेदी करून भ्रष्टाचार केला. ही सर्वांत मोठी फसवणूक आणि लबाडी असल्याचा आरोप विरोधी काँग्रेस पक्षाचा एक व पाच अपक्ष अशा सहा आमदारांनी शनिवारी एकत्रितरीत्या केला. सोमवारपासून सुरू होत असलेल्या विधानसभा अधिवेशनावेळी मंत्री नाईक यांना कामकाजात भाग घेण्याचा नैतिक अधिकारच नाही, असे ठणकावत कामकाज रोखण्याचा इरादा अप्रत्यक्षरीत्या सूचित केला.
आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, विजय सरदेसाई, विश्वजित राणे, रोहन खंवटे व नरेश सावळ यांची येथे संयुक्त पत्रकार परिषद झाली. उद्योगमंत्री नाईक यांनी सरकारच्या विधिमंडळ खात्याकडून आमदारांना मिळणारे कर्ज घेतले. बिल्डरकडून त्यांनी आॅफर लेटर आणले. आपण फ्लॅट खरेदी करतो, असे ते पत्र होते. त्या पत्राच्या आधारे कर्ज घेऊन मग त्यांनी प्रत्यक्षात त्या बिल्डरकडून चार दुकाने खरेदी केली. त्या दुकानातून त्यांनी दरमहा १ लाख रुपयांचे भाडे घेतले. भाड्यापोटी आतापर्यंत त्यांनी लाखो रुपये कमावले आणि आता जनरेशन नेक्स्ट या भ्रष्टाचारविरोधी संस्थेने आरटीआयखाली अर्ज करताच मंत्री नाईक यांनी गुपचूप कर्ज भरून टाकले, (पान ४ वर)