अर्भक मृत्यूचे प्रमाण घटले

By Admin | Published: March 11, 2015 03:12 AM2015-03-11T03:12:31+5:302015-03-11T03:15:41+5:30

पणजी : राज्यात २००७ सालापासून आरोग्य खात्याच्या स्तरावरून सुरू झालेल्या प्रयत्नांचे फळ म्हणून आता अर्भक मृत्यूचे प्रमाण

Infant mortality decreases | अर्भक मृत्यूचे प्रमाण घटले

अर्भक मृत्यूचे प्रमाण घटले

googlenewsNext

पणजी : राज्यात २००७ सालापासून आरोग्य खात्याच्या स्तरावरून सुरू झालेल्या प्रयत्नांचे फळ म्हणून आता अर्भक मृत्यूचे प्रमाण बरेच घटले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची दखल घेऊन गोव्याला ११२ कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी दिला आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये अर्भक मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. गोव्यात मात्र आता १ हजारामागे ९ असे प्रमाण झाले आहे. काही वर्षांपूर्वी हे प्रमाण हजारामागे १0 असे होते. म्हणजे एक हजार महिलांची प्रसुती झाली, तर त्यातील दहा अर्भकांचा बळी जात होता. याबाबत उपाययोजना करण्याची प्रक्रिया गेल्या २००७ सालापासून सुरू झाली व त्यामुळे आता अर्भक मृत्यूचे प्रमाण हजारामागे नऊ झाले आहे, असे उपमुख्यमंत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांनी सांगितले.
दरम्यान, बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात हृदयरोगविषयक सुपरस्पेशालिटीची सुविधा सुरू झाल्यानंतर आता वर्षभरात २१०० व्यक्तींवर हृदयरोगविषयक उपचार करण्यात आले. यात अँजीओग्राफी व अँजीओप्लास्टीचा समावेश आहे. २१०० पैकी केवळ एकच व्यक्ती उपचारानंतर दगावली. उर्वरित सगळे ठिक आहेत, असे उपमुख्यमंत्री
डिसोझा यांनी सांगितले.
राज्यात स्वाईन फ्लू नियंत्रणात आहे. आतापर्यंत ६९ व्यक्तींच्या थुंकीचे नमुने दिल्लीला पाठविण्यात आले. त्या सर्वांचे अहवाल आले. प्रत्येक चाचणीसाठी सरकारला ४ हजार ५०३ रुपयांचा खर्च करावा लागला. दिल्लीहून अहवाल येण्यास विलंब लागतो. यापुढे आम्ही कर्नाटकमधील मणिपालमध्ये नमुने पाठवू. तिथे एका चाचणीसाठी साडेचारशे रुपयांचा खर्च येईल, असे डिसोझा यांनी सांगितले.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Infant mortality decreases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.