मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती आर्चबिशप व स्वामींनाही देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 07:13 PM2018-05-25T19:13:42+5:302018-05-25T19:13:42+5:30
केंद्रातील मोदी सरकार आज शनिवारी आपल्या कारकिर्दीची चार वर्षे पूर्ण करत आहे. चार वर्षात सरकारने जे योगदान दिले, ज्या योजना आणल्या आणि कामे केली त्याविषयी लोकांना माहिती देण्यासाठी आज शनिवारपासून भाजप जनसंपर्क अभियान राबवणार आहे.
पणजी - केंद्रातील मोदी सरकार आज शनिवारी आपल्या कारकिर्दीची चार वर्षे पूर्ण करत आहे. चार वर्षात सरकारने जे योगदान दिले, ज्या योजना आणल्या आणि कामे केली त्याविषयी लोकांना माहिती देण्यासाठी आज शनिवारपासून भाजप जनसंपर्क अभियान राबवणार आहे. या अभियानावेळी खासदार, मंत्री, आमदार, प्रमुख पदाधिकारी लोकसंपर्क करतील. गोव्याचे आर्चबिशप, मुल्लामौलवी व स्वामींना देखील भाजप नेते भेटून कामाची माहिती देतील.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, सदानंद शेट तानावडे आणि अनिल होबळे यांनी येथे पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. भाजपच्या प्रमुख पदाधिका:यांची व आमदारांची शुक्रवारी सायंकाळी पक्ष कार्यालयात बैठक झाली. त्यानंतर बोलताना तेंडुलकर म्हणाले, की मोदी सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना आणल्या व विकास कामेही केली. याबाबत ज्येष्ठ नागरिकांना, निवृत्त सरकारी अधिकारी व इतर लोकांना माहिती दिली जाईल. निवृत्त न्यायाधीश, निवृत्त अधिकारी तसेच सर्व धर्माचे प्रमुख यांना भाजपचे नेते भेटतील. पत्रकांचे वितरण करून सविस्तर माहिती दिली जाईल.
तानावडे म्हणाले, की दि. 26 मेपासून सुरू होणारे अभियना दि. 11 जूनर्पयत चालेल. भाजपच्या योजनांचा ज्यांना लाभ मिळाला आहे, त्यांची दोन जिल्हास्तरीय संमेलने गोव्यात अभियानावेळी आयोजित केली जातील. बुद्धीजीविंची दोन संमेलने आयोजित केली जातील. या शिवाय भाजपच्या युवा कार्यकत्र्यातर्फे तालुकास्तरावर दुचाक्यांची रॅली आयोजित करण्यात येणार आहे. एकूण सहा हजार युवक सात तालुक्यांमध्ये दुचाक्यांची रॅली काढतील.
तानावडे म्हणाले, की राज्यातील अनुसूचित जमाती व अनुसूचित जातींमधील लोकांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाईल. त्यांच्याकडे जाऊन त्यांना मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती दिली जाईल. एकूण आठ हजार एसटी बांधवांर्पयत भाजपचे कार्यकर्ते पोहचतील. महिला मोर्चावरही जबाबदारी सोपवली गेली आहे. प्रत्येक बुथ क्षेत्रतील किमान पन्नास घरांमध्ये महिला कार्यकत्र्यानी जाऊन पत्रके वितरित करावीत असे सूचविण्यात आले आहे. भाजपने अभियान सर्व स्तरांवर यशस्वी करण्यासाठी विविध समित्या स्थापन केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक संपर्क अभियानही होईल. तीन हजार ज्येष्ठ नागरिकांना भाजपचे नेते भेटतील. भाजप खासदारांच्या नियमितपणो पत्रकार परिषदा होतील.