बोगस सॅंड मायनिंग परवाने प्रकरणात चौकशी करा: खंडपीठ
By वासुदेव.पागी | Published: March 18, 2024 04:38 PM2024-03-18T16:38:16+5:302024-03-18T16:39:00+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गंभीर दाखल घेतली असून या प्रकरणात चौकशी करण्याचा आदेश सरकारला दिला आहे.
पणजी: गोव्यात रेती उत्खननावर बंदी असताना एका ट्रक चालकाने सेंड मायनिंग चे परवाने सादर केल्यामुळे गोंधळ उडाला आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गंभीर दाखल घेतली असून या प्रकरणात चौकशी करण्याचा आदेश सरकारला दिला आहे.
सॅंड मायनिंग प्रकरणातील याचिका सोमवारी न्यायालयात सुनावणीस आली त्यावेळी हा बोगस परवान्याचा मुद्दा उपस्थित झाला. खाण खात्याकडून अशा प्रकारचे कसलेच परवाने देण्यात आले नसल्याचे सरकारी वकिलाने न्यायालयात सांगितले. त्यावर या परवान्याची चौकशी करण्यात यावी असा आदेश न्यायालयाने दिला.
दरम्यान गोव्यात बेकायदा रेती उत्खनन पूर्णपणे बंद झाल्याचे गोव्याचे एडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी न्यायालयात सांगितले. कुठेही बेकायदेशीरपणे रेती उत्खनन चालू असल्याच्या घटना घडल्या नाहीत अशी माहिती त्यांनी न्यायालयात दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदेशीर रेती उत्खननात सापडलेले साहित्य जप्त करण्यात आले होते. जप्त करण्यात आलेली रेती लिलावात काढण्याचा अधिक देण्यात आला होता. तसेच ज्या होड्या जप्त करण्यात आल्या होत्या त्या नष्ट करण्याचा आदेश देण्यात आला होता. परंतु या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचा डावा याची कादाराने केला आहे