दिवाळखोरीत निघालेल्या सोसायट्यांची चौकशी होणार - शिरोडकर
By काशिराम म्हांबरे | Published: November 18, 2023 04:23 PM2023-11-18T16:23:41+5:302023-11-18T16:29:34+5:30
दिवाळखोरीत निघालेल्या संस्थेतील ३५ बार्देशात तर १२ पेडणे तालुक्यातील आहेत. यात विश्वासाने गुंतवणुक करणारे लोक हे सामान्यातील आहेत.
म्हापसा: उत्तर गोव्यातील पेडणे तसेच बार्देश तालुक्यातून ४७ सहकार सोसायट्या दिवाळखोरीत काढण्यात आल्या आहेत. त्या मागची कारणे स्पष्ट होण्यासाठी चौकशी करण्याचे आदेश सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिलेआहेत.
दिवाळखोरीत निघालेल्या संस्थेतील ३५ बार्देशात तर १२ पेडणे तालुक्यातील आहेत. यात विश्वासाने गुंतवणुक करणारे लोक हे सामान्यातील आहेत. म्हापसा अर्बन किंवा मडगांव अर्बन बँक दिवाळखोरीत निघणे हा त्या शहरावर लागलेला एक ठपका आहे. त्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ शकते. ती दूर होण्यासाठी दिवाळखोरीत निघण्यामागचे कारण शोधून काढले जाणार असल्याचे शिरोडकर म्हणाले. सदर अहवाल १५ दिवसात सादर केला जाईल असेही ते यावेळी म्हणाले.
७० व्या अखिल भारतीय सहकार सप्तहा निमीत्त बार्देशातील उपनिबंधक च्या वतिने म्हापशात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिरोडकर बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत उपनिबंधक सिताराम सावळ, डॉ. अमृत नाईक, हरीष नाईक, नगराध्यक्षा प्रिया मिशाळ उपस्थित होते. कार्यक्रमाला सहकार क्षेत्रात चांगले कार्य करणाºया सोसायट्यांचा त्यांच्या अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला.