१७ व १८ रोजी मांद्रेत अंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 07:17 PM2019-01-09T19:17:43+5:302019-01-09T19:18:25+5:30
यंदाचा पतंग होत्सव हा १७ व १८ जानेवारी रोजी मांद्रे समुद्र किना-यावर होणार आहे.
पणजी - यंदाचा पतंग होत्सव हा १७ व १८ जानेवारी रोजी मांद्रे समुद्र किना-यावर होणार असून त्यात पतंग उडविण्यासाठी विदेशातील २० जण येणार आहेत तर देशातून २१ देशी असणार आहेत अशी माहिती आयोजक बेळगावचे आमदार अभय पाटील यांच्या समुहाने दिली आहे.
बेळगावच्या या समुहाकडून दर वर्षी गोवा पर्यटन महामंडळाच्या सहकार्याने अयोजित करण्यात येणारा हा अंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव एरव्ही मिरामार समुद्र किना-यावर होत होता, परंतु यंदा तो मांद्रे समुद्र किना-यावर होणार आहे. पतंग महोत्सव राज्यात सर्वत्र करण्यात यावा अशी सूचना राज्य सरकारची होती. त्यामुळे प्रत्येक वर्षी विविध ठिकाणी हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत बलताना आयोजकाच्या वतीने अशोक नाईक यांनी ही माहिती दिली. पतंग महोत्सव हा १७ रोजी सकाळी १०.३० वाजता सुरू होईल व नंतर १८ रोजी संध्याकाळी २ वाजता त्याचा समारोप होईल असे त्यांनी सांगितले.
गोव्यात दरवर्षी होणा-या या पतंग महोत्सवाला गोव्यातील पत्रारानी प्रचंढ प्रसिद्धी दिल्यामुळे राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावरही या महोत्सवाला प्रसिद्धी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अनेक देशात असे महोत्सव आयोजित केले जातात. गोव्यात होणाºया या महोत्सवात अस्ट्रेलियातून बेल्जियम, कॅनडा, इस्टोनिया, टर्की, मलेसिया, जर्मनी, युनाईटेड किंग्डण, रशिया आणि इटालीहून प्रत्येकी दोगे जण सहभागी होणार आहेत. तसेच अस्ट्रेलिया व सिंगापूरमधून एक एक जण सहभागी होणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली. विदेशातून येणारे हे पतंग कलाकार केवळ पतंग उडविण्याच्या त्यांच्या छंदाच्या प्रेमापाई येतात. त्यांना थोडेफार मानधन दिले जाते. शिवाय राहाण्याचा खर्च वगैरे मिळून सुमारे ३२ लाख रुपये खर्च होत असतो. पर्यटन महामंडळाकडूनही या कार्यक्रमासाठी खूप सहकार्य दिले जात असल्याचे सतीश कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. गोव्यातून अद्याप कुणी पतंग उडविण्यासाठी इच्छुक मंडळी पुढे येत नाही हे खरे आहे, परंतु अलिकडे एका देसाई नामक गोमंतकियाने त्यात रस दाखविल्याचे त्यांनी सांगितले.