गुगलकडून गोव्यात इंटरनेट क्रांती

By Admin | Published: August 30, 2016 07:29 PM2016-08-30T19:29:16+5:302016-08-30T19:29:16+5:30

गुगल इंडियाने गोव्यात इंटरनेट क्रांती करण्याचे ठरविले असून त्यासाठी गुगल व गोवा सरकारने मिळून मंगळवारी समझोता करारावर सह्या केल्या.

Internet revolution in Goa | गुगलकडून गोव्यात इंटरनेट क्रांती

गुगलकडून गोव्यात इंटरनेट क्रांती

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
 
पणजी, दि. 30 -  गुगल इंडियाने गोव्यात इंटरनेट क्रांती करण्याचे ठरविले असून त्यासाठी गुगल व गोवा सरकारने मिळून मंगळवारी समझोता करारावर सह्या केल्या. राज्यातील महिलांमध्ये डिजिटल साक्षरता वाढविणो व नववी ते बारावीर्पयतच्या विद्याथ्र्याना सुरक्षितपणो इंटरनेट कसा वापरणो याचे शिक्षण द्यावे असे लक्ष्य गुगल व राज्य सरकारने मिळून समोर ठेवले आहे.
राज्यातील सर्व लहान उद्योगांना ऑनलाईन आणले जाणार आहे. इंटरनेटवर त्यांना स्थान असेल. लघू व मध्यम स्वरुपाचे धंदे करणा:या व्यवसायिकांसाठी इंटरनेट सुरक्षा प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित केले जातील. तसेच सरकारच्या सर्व वेबसाईट्स मोबाईलफ्रेण्डली केल्या जातील, असे गुगलचे वरिष्ठ अधिकारी राजन आनंदन यांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या उपस्थितीत जाहीर केले. 
गोव्याचा वैभवसंपन्न सांस्कृतिक वारसा जागतिक नकाशावर येईल. बीटेक,बीई आणि एमसीए अशा प्रकारचे अभ्यासक्रम शिकणा:या विद्याथ्र्यामध्ये अॅण्ड्रॉईड डेव्हलपर शिक्षण विकसित केले जाईल. गोव्यातील स्टार्टअप कम्युनिटीला पाठींबा दिला जाईल, असे आनंदन यांनी सांगितले. अतिशय वेगाच्या इंटरनेटचे अनेक फायदे असतात. दिल्लीच्या रेल्वे स्थानकावर इंटरनेटचा वेग जेवढा आहे, तेवढा माङया कार्यालयात देखील नाही, असे आनंदन म्हणाले. 
8क् हजार विद्याथ्र्याना शिक्षण
राज्यातील 46क् सरकारी हायस्कुलमधील नववी ते बारावीच्या 8क् हजार विद्याथ्र्याना इंटरनेट सुरक्षा शिक्षण दिले जाईल. इंटरनेटचा सुरक्षितपणो वापर कसा करावा याविषयी विद्याथ्र्याना शिक्षित करताना हा विषय त्यांच्या अभ्यासक्रमातच समाविष्ट केला जाणार आहे. सरकारने त्यासाठी मान्यता दिली आहे. तज्ज्ञांशी चर्चा व सल्लामसलत करून गुगलने तसा अभ्यासक्रम तयार केला आहे.
मुख्यमंत्री पार्सेकर यांनी यावेळी विचार मांडले. गोव्याला ज्या प्रमाणो पर्यटनासाठी ओळखले जाते, त्याचप्रमाणो आयटीसाठीही ओळखले जावे असा आमचा प्रयत्न आहे. गुगलशी झालेला करार हा मैलांचा दगड आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव, वरिष्ठ अधिकारी अमेय अभ्यंकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष नितीन कुंकळ्ळ्य़ेकर उपस्थित होते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रतील नवी दालने गोव्यासाठी हा करार खुली करील, असा विश्वास श्रीवास्तव यांनी व्यक्त केला.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Internet revolution in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.