समुद्रपलीकडचे पर्यटन संकल्पनेला सुरुवात; भागदारकांशी बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 03:36 PM2023-09-28T15:36:11+5:302023-09-28T15:37:05+5:30
पर्यटन मंत्री रोहन खंवटे
नारायण गावस
पणजी: समुद्रपलीकडचे पर्यटन ही संकल्पना सत्यात आणण्यासाठी पर्यटन खाते विविध उपक्रम राबवित आहे. नुकतेच या विषयी भागदारांची बैठक झाली असून यात आध्यात्मिक पर्यटन इको पर्यटन होमस्टेय या विषयावर चर्चा झाली आहे. लवकरच पुढच्या महिन्यापासून पर्यटन खाते याच्यावर काम करणार आहे. असे पर्यटन मंत्री राेहन खंवटे यांनी सांगितले यावेळी त्याच्यासोबत मंदिर कनेक्ट मोहिमेचे गिरीष कुलकर्णी, संजीव सरदेसाई व इतर भागदारक उपस्थित हाेते. - पर्यटन खाते फक्त घेषणा करुन दाखवत नाही तर सर्व कामे सत्यात आणत आहे.
आता लवकरच मंदिर कनेक्ट माेहीम सुरु केली जाणार आहे. तसेच राज्यपातळीवर शिवजयंती साजरी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे पर्यटकाना गोव्यात ऐकही मंदिर उदा. सत्पकाेटेश्वर मंदिर तांबडी सुर्ला याच्याशी कनेक्ट होणार आहे. गाेव्यात येणारे पर्यटक हे या अगोदर फक़्त गाेव्यातील समुद्र किनारे तसेच इतर काही कारणासाठी येत होते. पण त्यात आम्ही माेठ्या प्रमाणात बदल आणले आहे. याला आतापासुन चांगली प्रसिद्धी मिळत असून अनेक भागदारक याला जाेडले गेले आहे. असे मंत्री खंवटे म्हणाले.
- गाेव्यातील लाेकांना देहरादून, काशी, गुवाहटी असे अनेक आध्यात्मिक जाग्यावर कमी वेळेत पावता येते. यासाठी विमानसेवाही सुरु केली केली आहे. याचा फायदा गोव्यातील लाेकांना हाेणार आहे. गोवा आता माेठ्या प्रमाणात बदल होत आहे. गाेव्यात वसतीगृहांना मोठी मागणी आहे. तसेच व्हेलनेस पर्यटनाला मोठी मागणी आहे. त्याचप्रमाणे आता क्रिडा पर्यटन गाेव्यात सुरु झाले आहे. त्यामुळे अनेक पर्यटक गाेव्यात येत आहे. असे मंत्री खंवट यांनी सांगितले.
- गोव्याला आध्यात्मिक दर्जा
गोवा ही परशुराम भुमी म्हणून ओळखली जाते. गोव्यात अनेक पुरातन अशी मंदिर आहेत. या मंदिराचा इतिहास याची माहिती िदिली जाणार. यासाठी मंदिर कनेक्ट ही याेजना सुरु केली आहे. गाेवा सरकारने याला मान्यता दिली आहे. त्यामुळे गाेव्यात आता लवकरच मंदिरे कनेक्ट करायला सुरुवात होणार आहे. असे या मोहिमेचे अध्यक्ष गिरीष कुलकर्णी यांनी सांगितले.