लाला की बस्ती प्रमाणे राज्यातील इतर बेकायदेशीर वस्त्यांची चौकशी व्हावी: आंतरराष्ट्रीय बजरंग दल गोवा शाखेची मागणी

By समीर नाईक | Published: May 24, 2024 02:59 PM2024-05-24T14:59:38+5:302024-05-24T14:59:46+5:30

लाला की बस्ती येथे कोणत्याही रितसर कागदपत्राशिवाय बांग्लादेशी, रोहिंग्या यांचे वास्तव आहे.

Investigation into other illegal settlements in state like Lala Ki Basti: International Bajrang Dal Goa branch demands | लाला की बस्ती प्रमाणे राज्यातील इतर बेकायदेशीर वस्त्यांची चौकशी व्हावी: आंतरराष्ट्रीय बजरंग दल गोवा शाखेची मागणी

लाला की बस्ती प्रमाणे राज्यातील इतर बेकायदेशीर वस्त्यांची चौकशी व्हावी: आंतरराष्ट्रीय बजरंग दल गोवा शाखेची मागणी

पणजी: थिवी येथील लाला की बस्ती भागातून ९६ भाडेकरूना अटक ही घटना हलकी घेऊ नका, अशा अनेक वस्त्या गोव्यात अनेक ठिकाणी आहेत. उद्या गोव्याचे वायनाड झाले तर आश्चर्य वाटायला नको. या सर्व परिस्थितीचा अभ्यास सरकारने आतातरी करायची गरज असल्याचे आंतरराष्ट्रीय बजरंग दल गोवाचे प्रमुख नितिन फळदेसाई यांनी म्हटले आहे. 

लाला की बस्ती येथे कोणत्याही रितसर कागदपत्राशिवाय बांग्लादेशी, रोहिंग्या यांचे वास्तव आहे. केवळ राजकिय लाभापोटी ही लोकं येथे रहात आहेत. हे कोणाच्या तरी पाठींब्याशिवाय शक्य नाही. यांच्या मागचा सुत्रधार सरकारने शोधायला हवा, असेही फळदेसाई पुढे म्हणाले.

बायणा येथे मनोहर पर्रीकर यांनी काही वर्षांपूर्वी वेशावस्ती जमीनदोस्त केली होती. कारण या वस्तीत केवळ वेश्याव्यवसाय चालत नव्हता, ही वस्ती म्हणजे गुन्हेगारांचे आश्रयस्थान होते. ही वस्ती नाहिशी झाल्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे सहज शक्य झाले होते. आज सरकारने अशीच धडक कारवाई करण्याची गरज आहे. गुन्हेगारी मोहल्ले नेस्तनाबूत करण्याची गरज आहे, असे फळदेसाई यांनी पुढे सांगितले.

या प्रश्नावर सर्वांनी एकजुट राहून काम करण्याची गरज आहे. विविध राजकिय मतभेद विसरून सरकारला कारवाईसाठी दबाव आणला पहिजे, तरच राज्याचे अस्तित्व टिकून राहणार आहे, असेही फळदेसाई शेवटी म्हणाले.
 

Web Title: Investigation into other illegal settlements in state like Lala Ki Basti: International Bajrang Dal Goa branch demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा