'सेक्स स्कॅण्डल'ची चौकशी सुरू; मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट, तक्रारीवरून कारवाईचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 10:35 AM2023-08-31T10:35:00+5:302023-08-31T10:36:16+5:30
याप्रकरणी चौकशी सुरू झाली असल्याचे स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : मंत्र्यांविरुद्धच्या कथित सेक्स स्कॅण्डल प्रकरणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रथमच भाष्य करताना कोणाचीही बदनामी खपवून घेणार नाही. तक्रारीवरून कडक कारवाई करू, असे सांगत याप्रकरणी चौकशी सुरू झाली असल्याचे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही महिलेची अशा प्रकारे बदनामी होता. कामा नये. सोशल मीडियाचा गैरवापर करू नये. कारण नसताना एखाद्याचे नाव घेऊन बदनामी करणे योग्य नव्हे. पोलिसांकडे तक्रारी आलेल्या आहेत, त्यानुसार चौकशी सुरू केलेली आहे. सरकारमधील एक ज्येष्ठ मंत्री व महिला उपसरपंच यांचे कथित सेक्स स्कॅण्डल गेले चार-पाच दिवस गाजत आहे; परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यावर भाष्य केले नव्हते. पश्चिम विभागीय मंडळाच्या ३४ व्या बैठकीनिमित्त मुख्यमंत्री दोन, तीन दिवस गुजरातमध्ये होते. गोव्यात परतल्यावर काल पत्रकारांनी त्यांना यासंबंधी विचारले असता ते म्हणाले की, उगाच कोणीही कोणाच्याही वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करू नये. यापुढे कुठल्याही महिलेची बदनामी खपवून घेतली जाणार नाही.
महिलांच्या बाबतीत सोशल मीडियावरुन जी बदनामी केली जाते ती रोखण्यासाठी कडक कायदा करण्याची जी मागणी केली जात आहे, त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, मला काही जणांनी पत्रे पाठवली आहेत. बदनामीसंबंधी पोलिस तक्रारींवरून चौकशी सुरू केली असून संबंधितांवर कारवाई केली जाईल.