आयओए अध्यक्ष पी.टी उषा २६ रोजी राज्यात दाखल होणार
By समीर नाईक | Published: April 21, 2023 09:26 PM2023-04-21T21:26:04+5:302023-04-21T21:26:10+5:30
एकदा तांत्रिक अधिकाऱ्यांची टीमने देखील राज्यात येऊन आढावा घेतला आहे, असे गावडे यांनी यावेळी सांगितले.
समीर नाईक
पणजी: भारतीय ऑल्मिंपीक संघटनेच्या अध्यक्ष तथा खासदार पी.टी उषा दि. २६ एप्रिल रोजी राज्यात दाखल होणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पी.टी उषा राज्यात येणार आहे, अशी माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली.३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद यंदा गोव्याला मिळाले आहे.
ऑक्टोबर- नोव्हेंबर दरम्यान राज्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित होणे शक्य आहे. या अनुषंगाने भारतीय ऑल्मिंपीक संघटनेतर्फे वेळोवेळी राज्यात येऊन स्पर्धेबाबतच्या तयारीचा आढावा घेणे सुरुच आहे. यापूर्वी देखील दोन वेळा भारतीय ऑल्मिपिक संघटनेचे सदस्य अमिताभ शर्मा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ येऊन पाहणी केली होती. एकदा तांत्रिक अधिकाऱ्यांची टीमने देखील राज्यात येऊन आढावा घेतला आहे, असे गावडे यांनी यावेळी सांगितले.
पी.टी उषा यांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीने देखील आमची जवळपास पूर्ण तयारी झालेली आहे. गेल्यावेळी आलेल्या शिष्टमंडळाने अहवाल सादर करुन, ज्या सूचना केल्या होत्या त्यावरही काम सुरु आहे, असेही गावडे यांनी अधिक माहिती देताना सांगितले.