गोव्याच्या किना-यावरील आयआरबी पोलीस हटविले
By admin | Published: August 2, 2016 11:09 PM2016-08-02T23:09:29+5:302016-08-02T23:09:29+5:30
गोव्याच्या पर्यटन मोसमास येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आरंभ होणार आहे. त्यावेळी राज्याच्या पूर्ण किनारपट्टीत नियोजित पर्यटक सुरक्षा दलातर्फे जवानांची नियुक्ती केली जाईल, असे पर्यटन मंत्री
Next
- सदगुरू पाटील
पणजी, दि.२ - गोव्याच्या पर्यटन मोसमास येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आरंभ होणार आहे. त्यावेळी राज्याच्या पूर्ण किनारपट्टीत नियोजित पर्यटक सुरक्षा दलातर्फे जवानांची नियुक्ती केली जाईल, असे पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांनी लोकमतला सांगितले. किनारपट्टीत नियुक्त केलेले आयआरबी पोलिसांना हटविण्यात आले असल्याचेही परुळेकर यांनी सांगितले.
यापूर्वी किनारपट्टीत पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 154 आयआरबी पोलिस नियुक्त करण्यात आले होते. तथापि, आता केवळ 50 आयआरबी पोलिस तिथे ठेवून उर्वरितांना माघारी बोलविण्यात आले आहे. पर्यटन खात्यांतर्गत पर्यटक सुरक्षा दल स्थापण्याचा प्रस्ताव मंजुर झाला आहे. पहिल्या टप्प्यात एकूण
एकूण साठजणांची भरती आम्ही या दलामध्ये करणार आहोत.सध्या पावसाचा मोसम असल्याने पर्यटकांची किना:यांवर प्रचंड गर्दी होत नाही पण पावसाच्या दिवसांतही गोव्यात येणा:या पर्यटकांची संख्या ब:यापैकी आहे.
दरम्यान, पर्यटन मंत्री परुळेकर यांच्यावर सुरक्षा व्यवस्थेवीना फिरण्याची वेळ आली असल्याचे वृत्त लोकमतने दिल्यानंतर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गंभीरपणो दखल घेतली व वरिष्ठ पोलिस अधिका:यांशी चर्चा केली. विधानसभा अधिवेशन सुरू आहे व अशावेळी मंत्री परुळेकर यांना
कल्पना न देता त्यांच्या विश्वासातील दोघा पोलिसांना सुरक्षा व्यवस्थेतून बाहेर काढणो ही पोलिस खात्याची चूक होती ही गोष्ट मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिका:यांच्या नजरेस आणून दिली. आपल्या विश्वासातील दोघा पोलिसांची रात्रीच्यावेळी बदली करण्यात आल्याने नाराज होऊन मंत्री परुळेकर यांनी त्यांना असलेली सगळी व्हाय सुरक्षा नाकारली होती. तीन दिवस त्यांना सुरक्षा व्यवस्थेवीना रहावे लागले. अंगरक्षक व पीएसओही त्यांच्यासोबत नव्हते. मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन सूचना केल्यानंतर पोलिस खात्याने त्यांची सुरक्षा पूर्ववत केली. त्यांच्या विश्वासातील दोन्ही पोलिसांना पुन्हा परुळेकर यांच्या सुरक्षेसाठी पाठविण्यात आले.