आयरिश प्रकरणाचा 15 डिसेंबर रोजी होणार निवाडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 11:10 PM2017-12-11T23:10:03+5:302017-12-11T23:10:16+5:30
पणजी: महिलेची बदनामी प्रकरणात अॅड आयरीश रॉड्रिगीश यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर पणजी सत्र न्यायालय १५ रोजी निवाडा सुनावणार आहे.
पणजी: महिलेची बदनामी प्रकरणात अॅड आयरीश रॉड्रिगीश यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर पणजी सत्र न्यायालय १५ रोजी निवाडा सुनावणार आहे. या प्रकरणात उभय पक्षांचे युक्तिवाद सोमवारी पूर्ण झाले. महिलेची बदनामी प्रकरणात क्राईम ब्रँचकडून दुसरा समन्स बजावल्यानंतर आयरीश यांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता.
वास्तविक त्याच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा हा जामीनपात्र असतानाही त्यांनी अटकपूर्व जामीनसाठी धाव घेतली होती. आयरीश यांच्या अर्जानंतर न्यायालयाने क्राईम ब्रँचला नोटीस पाठविली होती. क्राईम ब्रँचने नोटिसीला प्रतिसाद देताना आयरीश हे तपासाला सहकार्य करीत नसल्याचे म्हटले होते. त्याच्यावर ज्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ती कलमे जामीनपात्र आहेत. त्यामुळे अटकपूर्व जामीन देण्याची गरज नाही असे क्राईम ब्रँचचे म्हणणे आहे.
आयरीश यांच्यावर जामीनपात्र कलमाअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला असला तरी क्राईम ब्रँच त्यात अतिरिक्त कलमे जोडू शकतात अशी भिती आयरीश यांना आहे. त्यामुळेच अटकपूर्व जामीनसाठी त्यांनी अर्ज केला आहे. तूर्त जामीनपात्र कलमे लावण्यात आली असली तरी त्यात अतिरिक्त कलमे जोडली जाणार नाहीत याची ग्वाही क्राईम ब्रँचकडे मागण्यात आली होती. परंतु ती देण्यास क्राईम ब्रँचने नकार दिला. आतापर्यंतच्या तपासातील निष्कर्शात तरी त्यांच्यावर अतिरिक्त कलम लावण्याची गरज भासलेली नाही असे क्राईम ब्रँचचे म्हमणे आहे.
शिवोली येथील एका महिलेल्या विरोधात अश्लील प्रचार करण्याच्या प्रकरणात आणि सोशल मीडियावर फोटो प्रसिद्ध करण्याचा प्रकरणात आयरीश विरुद्ध हणजूण पोलीस स्थानकात नोंदविण्यात अलेला गुन्हा क्राईम ब्रँचला हस्तांतरीत करण्यात आला होता. या प्रकरणात क्राईम ब्रँचचे निरीक्षक दत्तगुरू सावंत हे तपास करीत असून त्यांनी बुधवारीच त्यांना समन्स पाठवून चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते.