स्मार्ट सिटीचा बेजबाबदारपणा कायम, सांतीनेज येथील महिला खड्ड्यात पडून जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 03:34 PM2024-02-03T15:34:47+5:302024-02-03T15:35:17+5:30

सिसिल रॉड्रिग्ज म्हणाल्या गेली अनेक वर्षे स्मार्ट सिटीची कामे पणजीत सुरु आहेत तरीही ही कामे सुरळीत होत नाही.

Irresponsibility of smart city continues: Woman in Santinez injured after falling into pit | स्मार्ट सिटीचा बेजबाबदारपणा कायम, सांतीनेज येथील महिला खड्ड्यात पडून जखमी

स्मार्ट सिटीचा बेजबाबदारपणा कायम, सांतीनेज येथील महिला खड्ड्यात पडून जखमी

पणजी (नारायण गावस) : पणजी स्मार्ट सिटीची कामे ही बेजबाबदार पणाने सुरु आहे याची अनेक उदाहरणे आहेत. वेळाेेवेळी या विरोधात आवाज उठवूनही ही कामे अशीच सुरु आहेत. सांतीनेज येथील सर्वच रस्ते एकाचवेळी खाेदल्याने लाेकांना नाहक त्रास होत आहेत.

काल एक महिला या खोदलेल्या खड्ड्यात पडून जखमी झाली आहे. पण येथे खोदल्याने तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिका पाेहचली नाही, असे आम आदमी पक्षाच्या नेत्या सिसिल रॉड्रि्ग्ज यांनी सांगितले. सिसिल रॉड्रिग्ज म्हणाल्या गेली अनेक वर्षे स्मार्ट सिटीची कामे पणजीत सुरु आहेत तरीही ही कामे सुरळीत होत नाही. बेजबाबदार कामे सर्वत्र सुरुच आहेत. याचा त्रास लोकांना होत असतो. एक रस्त्याचे काम पूर्ण न करता दुसरे रस्ते खोदले जातात एकाच वेळी सर्व रस्ते खोदले जात असल्याने सर्वांना याचा त्रास होत आहे. सांतीनेज भागात वसतीगृहामधील सर्व रस्ते एकत्र खोदले आहेत. तसेच येथे दिशादर्शक फलक नाही तसेच रात्रीच्या वेळी उजेडाची साेयही केलेली नाही. त्यामुळे अपघात हाेण्याची शक्यता जास्त आहे.

सिसिल रॉड्रिग्ज यांनी सांगितले की स्मार्ट सिटीच्या या बेजबाबदार कामामुळे अनेक लोक जखमी झाले आहेत. पणजी दुकानदार तसेच रहिवाशांना याचा मोठा फटका बसला आहे. लाेकांना आपली दुकाने बंद करावी लागली. अनेक जणांच्या घरांमध्ये मातीचा धुरळ जात असल्याने लाेक आजारी पडत आहेत. अनेक लाेकांच्या गाड्या या खड्यांमुळे खराब झाल्या पण स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी याची काहीच दखल घेतली नाही. तसेच लाेकांना काम करताना विश्वासात घेत नाही. सरकारने याची गंभीर दखल घ्यावी.

Web Title: Irresponsibility of smart city continues: Woman in Santinez injured after falling into pit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा